पोहरादेवीत शासकीय योजनांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 04:06 PM2018-12-03T16:06:59+5:302018-12-03T16:07:51+5:30

वाशिम : पोहरादेवी ता. मानोरा येथील धार्मिक कार्यक्रमात जनसागर उसळणार असल्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विविध शासकीय योजना, उपक्रमांचे जनजागृतीपर पोस्टर्स् लावण्यात आले होते.

Awairness about Government's schemes in poharadevi | पोहरादेवीत शासकीय योजनांचा जागर

पोहरादेवीत शासकीय योजनांचा जागर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पोहरादेवी ता. मानोरा येथील धार्मिक कार्यक्रमात जनसागर उसळणार असल्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विविध शासकीय योजना, उपक्रमांचे जनजागृतीपर पोस्टर्स् लावण्यात आले होते. बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छ भारत मिशन, व्यसनमुक्ती आदींचा संदेश देण्यात आला.
स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तरातील तफावत कमी करण्याबरोबरच मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविले जात आहे. या अभियानात वाशिम जिल्ह्याचा समावेश असून, पोहरादेवी येथील धार्मिक कार्यक्रमात उपस्थितांना बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी महिला व बालकल्याण विभागाला दिल्या होत्या. त्याअनुषंगाने ठिकठिकाणी बंजारा बोलीभाषेत असलेले पोस्टसर्् लावण्यात आले होते. याप्रमाणेच व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत मिशन आदींचेही पोस्टसर्् लावण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशनच्या चमूने स्वच्छतेसाठी ठिकठिकाणी बकेट व अन्य सुविधा उपलब्ध केल्या होत्या.

Web Title: Awairness about Government's schemes in poharadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.