रिसोड तालुक्यातील आगग्रस्तांना मुख्यमंत्री  सहाय्यता निधीतून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 07:08 PM2018-01-18T19:08:33+5:302018-01-18T19:11:19+5:30

रिसोड:  गतवर्षी ८ मार्च २०१७ रोजी रिसोड शहरात कापडाच्या १४ दुकानांत आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेतील नुकसाग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंजूर झाली आहे. एकूण १४ बाधितांसाठी मिळून २.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्या मदतीचे वितरण आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Assistance from the Chief Minister's Assistance to Fire Accidents in Risod taluka | रिसोड तालुक्यातील आगग्रस्तांना मुख्यमंत्री  सहाय्यता निधीतून मदत

रिसोड तालुक्यातील आगग्रस्तांना मुख्यमंत्री  सहाय्यता निधीतून मदत

Next
ठळक मुद्दे१४ जणांचा समावेशआमदार अमित झनक यांच्या हस्ते होणार मदतीचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड:  गतवर्षी ८ मार्च २०१७ रोजी रिसोड शहरात कापडाच्या १४ दुकानांत आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेतील नुकसाग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंजूर झाली आहे. एकूण १४ बाधितांसाठी मिळून २.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्या मदतीचे वितरण आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
रिसाडे शहरात गतवर्षी ८ मार्चला बाजारात अचानक आग लागून १४ व्यावसायिकांना त्याचा फटका बसला होता. या नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी म्हणून आमदार अमित झनक यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे नुकसानग्रस्तांसाठी २.३५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. यामध्ये राजू बेलोकार, अशोक थोरा, संजय चौधरी, सुरज राऊत यांना प्रत्येकी २० हजार, नितिन थोरात, दिलीप चौधरी, मधुकर राऊत, गजानन राऊत, दामोदर वांगकर, गजानन ऐतवार आणि संदीप सोनटक्के यांना प्रत्येकी १५ हजार, तर प्रकाश वासुदेव पांडे यांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. सदर रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुंबई येथील मुख्य शाखेतून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वाशिम येथील शाखेत वर्ग करण्यात आली आहे. सदर रक्कम बाधित व्यक्तींना आवश्यक ती पडताळणी करून वितरीत करण्यात येणार आहे. 
 
Web Title: Assistance from the Chief Minister's Assistance to Fire Accidents in Risod taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम