मालेगावात अभियंत्यास मारहाण : मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनके कडून निषेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:32 PM2017-11-02T13:32:05+5:302017-11-02T13:32:32+5:30

assault on engineer: Backward Classes Organization protest the insident | मालेगावात अभियंत्यास मारहाण : मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनके कडून निषेध!

मालेगावात अभियंत्यास मारहाण : मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनके कडून निषेध!

Next
ठळक मुद्देआरोपिंवर कारवाई करण्याची मागणी


मंगरुळपीर :  मालेगाव येथील महावितरणचे उपविभागीय अभियंता  शरद पांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विघुत कर्मचारी संघटनेकडून झालेल्या प्रकरणाचा निषेध मंगरुळपिर येथे व्यक्त करण्यात आला. कायदा हातात घेऊन मारहाण करणाºया व शासकीय कामात अडथडा निर्माण करणाºया आरोपींना कठोर शिक्षा करण्याची  मागणी संघटनेकडून करण्यात आली . 

         दिवसेंदिवस महावितरण कर्मचाºयांना होणाºया मारहाणीच्या घटनेत वाढ होत असून त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

यापुढे असे प्रकार घडणार नाही व यावर पूर्णपणे आळा घालण्यात यावा अशी मागणी मागासवर्गीय विघुत कर्मचारी  संघटन वाशिम कडून करण्यात आली.

यावेळी संघटनेचे झोन अध्यक्ष एम डी उईके,झोन सहसचिव वसंत हाके, झोन सदस्य के एस पवार,सर्कल अध्यक्ष एस सी भगत,सर्कल सचिव संतोष इंगोले,सर्कल सहसचिव प्रशांत भगत,विभागीय अध्यक्ष एम जी मनवर,विभागीय सचिव बबन अंभोरे,विभागीय सहसचिव दिनेश भगत,रवींद्र गिरी,निलेश दिघोडे,युवराज मनवर,विनोद राऊत,अविनाश जाधव ,दिनेश राठोड,सतीश महल्ले,प्रवीण राठोड,विनय आठवले,महादू गवळी,रुपाली भगत,संजय खंडारे,गोपाल माणतोडे,रुपराव इंगोले,अतुल देशमुख,कु सुप्रिया खाडे,ढंगारे,मोरकर,कु आरती धुर्वे,मेश्राम,कु दडमल,कु कन्नके व असंख्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: assault on engineer: Backward Classes Organization protest the insident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.