आरोपीकडून हत्येची कबुली

By admin | Published: May 20, 2017 01:41 AM2017-05-20T01:41:55+5:302017-05-20T01:41:55+5:30

पसरणी उपसरपंच हत्या प्रकरण : हत्येमागील कारणे व खऱ्या सूत्रधाराचा शोध सुरू

Assassination of the accused by the accused | आरोपीकडून हत्येची कबुली

आरोपीकडून हत्येची कबुली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: तालुक्यातील पसरणी येथील ३८ वर्षीय उपसरपंच विलास पोटपिटे यांच्या हत्येप्रकरणात १८ मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मेहबूब मदन चौधरी याने हत्येची कबुली दिली आहे.
या हत्या प्रकरणात कोण कोण खरे सूत्रधार आहेत, खुनाचे नेमके कारण काय, या गोष्टीचा शोध घेण्यासाठी कारंजा पोलीस तपास करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी दिली.
अटक केलेल्या आरोपीकडून हत्येमागील कारणे व खरा सूत्रधार शोधण्याच्या तपास सुरू आहे. येत्या दोन दिवसात पसरणी उपसरपंच विलास पोटपिटे यांच्या खुनामागील खरा सूत्रधार पुढे येईल, असा विश्वास पोलीस विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
विलास पोटपिटे यांचा खून वेगळ्या पद्धतीने करून त्यांचा मोबाइल व इतर कागदपत्रे घटनास्थळाहून काही अंतरावर म्हणजेच इंझोरी रस्त्यावरील पुलावर फेकून दिल्याची माहिती देणाऱ्या पसरणी येथील मेहबूब मदन चौधरी या युवकाला १८ मे रोजी अटक केल्यामुळे खरा खुनी कोण व कशासाठी विलास पोटपिटे यांचा खून झाला हे शोधणे पोलिसांना कठीण नसल्याचे बोलल्या जात आहे; मात्र या खुनामागे राजकीय प्रतिष्ठितांचा सहभाग असल्याच्या सुगाव्यामुळे पोलीस गुप्तता पाळत असताही पोलिसावर राजकीय दबात येत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तथापि, पोलिसांना या घटनेचे गूढ उकलण्यात यश आले असून, हत्या घडवून आणण्यात कुणाकुणाचा सहभाग होता, हत्येमागील खरे कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहे.
कारंजा पोलिसांनी अटक केलेल्या महेबूब चौधरी याच्या सांगण्यानुसार पोलिसांनी चार ते पाच व्यक्तीची कसून चैकशी केली. दरम्यान, त्याला १८ मे रोजी न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायाधीशांनी त्याला २३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
वाशिम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले तपास करीत आहे. यांना पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन व पोलीस कर्मचारी सहकार्य करीत आहे.

Web Title: Assassination of the accused by the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.