संतप्त शेतकरी धडकले लघुपाटबंधारेच्या कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 07:38 PM2017-11-06T19:38:23+5:302017-11-06T19:55:33+5:30

वाशिम: सिंचन प्रकल्पात पाणी असूनही ते सिंचनासाठी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. ही बाब लक्षात घेवून अडोळ सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी असंख्य शेतकºयांनी सोमवारी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देवून कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांच्यासोबत चर्चा केली. 

Angry farmer falls on the meager water tank! | संतप्त शेतकरी धडकले लघुपाटबंधारेच्या कार्यालयावर!

संतप्त शेतकरी धडकले लघुपाटबंधारेच्या कार्यालयावर!

Next
ठळक मुद्देकार्यकारी अभियंत्यांशी चर्चासिंचनासाठी पाणी मिळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सिंचन प्रकल्पात पाणी असूनही ते सिंचनासाठी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. ही बाब लक्षात घेवून अडोळ सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी असंख्य शेतकºयांनी सोमवारी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देवून कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांच्यासोबत चर्चा केली. 
अडोळ प्रकल्पाची प्रकल्पीय सिंचन क्षमता १२.८९ दलघमीची असून आजमितीस या प्रकल्पात २.७६ दलघमी पाणी शिल्लक आहे. ते देखील पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून या प्रकल्पावरून रिसोड शहरासह काही खेड्यांना पाणी पुरविले जात आहे. मात्र, ज्या शेतकºयांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, त्यांना पाणी मिळेनासे झाल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकºयांनी करून किमान हरभरा पिकासाठी पाणी पुरविण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, यावर्षी पर्जन्यमान घटल्यामुळे पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य दिले जात असून सिंचनाकरिता पाणी पुरवावे, एवढा साठा प्रकल्पात शिल्लक नसल्यामुळेच ही बाब अशक्य असल्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सांगितले. 

Web Title: Angry farmer falls on the meager water tank!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.