ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत 'गॅस कनेक्शन'चे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:42 PM2018-07-20T13:42:31+5:302018-07-20T13:43:21+5:30

मानोरा  :  तालुक्यातील ग्राम म्हसणी येथे ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे गोरगरीब लाभार्थ्यांना तहसीलदार यांच्या उपस्थितीत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.

Allocation of 'Gas Connection' under Gram Swarajya Abhiyan | ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत 'गॅस कनेक्शन'चे वाटप

ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत 'गॅस कनेक्शन'चे वाटप

Next
ठळक मुद्देम्हसणी येथील ७४ लाभार्थ्यापैकी २१ लाभाथीना उज्वला गॅसचे कनेक्शन देण्यात आले. यावेळी ग्रा.पं.चे  उपसरपंच ग्रा.पं.सदस्य गावकरी मंडळी उपस्थि होते.


लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा  :  तालुक्यातील ग्राम म्हसणी येथे ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे गोरगरीब लाभार्थ्यांना तहसीलदार यांच्या उपस्थितीत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.
ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत गॅस कनेक्शन वाटपाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुनिल चव्हाण तहसीलदार मानोरा हे होते.  तर प्रमुख उपस्थितीत संजय निराधार चे अध्यक्ष निळकंठ पाटील, सुदाम तायडे, दक्षता समिती सदस्य पोहरादेवी  गॅस एजन्न्सी चे संचालक संजय महाराज, दक्षता समिती गजानन डहाके, सरपंच म्हसनी,  रत्नमाला नागफासे संजय गांधी निराधार सदस्या अन्नपुर्णा पांडे आदिंची उपस्थिती होती. यावेळी म्हसणी येथील ७४ लाभार्थ्यापैकी २१ लाभाथीना उज्वला गॅसचे कनेक्शन देण्यात आले. यावेळी तहसीलदार सुनिल चव्हाण यांनी एस.सी.एस.टी.च्या व अंतोदयच्या महिला पर्यंत लाभ पोहचवा असे आवाहन केले. यावेळी पाटील सुदाम तायडे,संजय महाराज यांनी आपले मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्नपूर्णा पांडे यांनी केले तर संचालन व आभार सुनिल इंगळे यांनी मांडले.यावेळी ग्रा.पं.चे  उपसरपंच ग्रा.पं.सदस्य गावकरी मंडळी उपस्थि होते.

Web Title: Allocation of 'Gas Connection' under Gram Swarajya Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.