कृषी समृध्दी महामार्ग : ठरल्यानुसार मोबदला मिळाला नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 03:56 PM2019-02-11T15:56:55+5:302019-02-11T15:57:28+5:30

वाशिम : रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांनी कृषी समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन केले तर सरळ खरेदीचे दर म्हणजे रेडी रेकनरच्या पाच पटीने दिले जातील असे सांगण्यात आले होते.  परंतु प्रत्यक्षात सर्व शेतकºयांना रेडी रेकनरच्या चारपटच मोबदला मिळाला असल्याची तक्रार काही शेतकºयांनी संबधितांकडे केली आहे.

Agricultural Growth Highway: Complaint of not being compensated according to the criteria | कृषी समृध्दी महामार्ग : ठरल्यानुसार मोबदला मिळाला नसल्याची तक्रार

कृषी समृध्दी महामार्ग : ठरल्यानुसार मोबदला मिळाला नसल्याची तक्रार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांनी कृषी समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन केले तर सरळ खरेदीचे दर म्हणजे रेडी रेकनरच्या पाच पटीने दिले जातील असे सांगण्यात आले होते.  परंतु प्रत्यक्षात सर्व शेतकºयांना रेडी रेकनरच्या चारपटच मोबदला मिळाला असल्याची तक्रार काही शेतकºयांनी संबधितांकडे केली आहे. परंतु याची दखल कोणीच घेत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेले दिसून येत आहेत.
कृषी समृद्धी महामार्गात रिधोरा ता. मालेगाव येथील गट नंबर ४७, व ४८ मधील वारंगी येथील कास्तकारांवर अवॉर्ड मध्ये अन्याय झाला आहे. २८ डिसेंबर २०१८ ला समृद्धी महामार्ग कारंजा उपविभागीय अधिकारी यांनी अवार्ड केले होते. त्यामध्ये २३ आॅक्टोबर २०१८ ला रस्ते विकास महामंडळाचे संचालकांना याबाबत शेतक-यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेवून, वस्तूस्थिती कथन केली होती. यावेळी त्यांनी भूसंपादन केले तरी, सरळ खरेदीचे दर रेडी रेकनरच्या पाच पटीने दिले जातील, तसेच अधिसूचना निघाल्यापासून व्याज सुद्धा दिल्या जाईल, असे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात सर्व शेतक-यांना  रेडी रेकनरच्या चारपटच मोबदला व व्याज सुद्धा न दिल्याने शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. जमिनीच्या प्रतवारीसंदभार्तील कारवाई उपविभागीय अधिकारी स्तरावर झाली आहे. मात्र, याबाबत शेतक-यांना तक्रारी असतील तर, जिल्हाधिका-यांमार्फत त्या तक्रारींचे शहानिशा नक्कीच केली जाते. तक्रार असल्यास शेतक-यांना प्रशासनाला अवगत करावे, असे  उपजिल्हाधिकारी सुनील माळी यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात सुभाष गणेशलाल मानधने,डिगांबर दहात्र्े, दत्ता नामदेव दहात्रे, उमेश मधुकर दहात्रे, संतोष डिगांबर दहात्रे यासह संबधित शेतकरी रस्ते विकास महामंडळांच्या संचालकांची भेटघेणार असल्याची माहिती आहे.

-शेतकºयांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास प्रशासनाला अवगत करावे. त्याची शहनिशा नक्कीच केल्या जाईल. 
- सुनिल माळी, 
उपजिल्हाधिकारी

Web Title: Agricultural Growth Highway: Complaint of not being compensated according to the criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.