दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 03:20 PM2019-06-11T15:20:50+5:302019-06-11T15:21:21+5:30

पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा, अशी मागणी गजानन ढवळे यांनी केली आहे. 

Agricultural education must be compulsory to class X | दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा ! 

दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा ! 

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: भारत हा कृषीप्रधान देश असून, शेतीतही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. त्याचा लाभ युवकांना व्हावा यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा, अशी मागणी शिरपूर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर गजानन ढवळे यांनी केंद्रीय मानव विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे ८ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे. 
डॉ. गजानन ढवळे यांच्या निवेदनाचा आशय असा की, सद्यस्थितीत शिक्षण घेणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला शासकीय नोकरी अपेक्षित असते. किंवा त्यासाठीच शिक्षण घेतल्या जाते. त्यामुळेच शेतीतून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता असताना आणि भारत कृषीप्रधान देश असतानाही शेतीकडे युवकांचे दुर्लक्ष आहे. शिक्षण घेतले म्हणजे हमखास सरकारी नोकरी मिळणार, असा समज अनेकांचा आहे. दुसरीकड सरकारी नोकºयांची संख्या घटल्याने उच्च शिक्षण घेणाºयांत उदासीनता निर्माण झाल्याचे व बेरोजगारी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असल्याचे लक्षात घेऊनच शैक्षणिक धोरण ठरविणे आणि दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कृषीविषयक ज्ञान प्राप्त होऊन शेतीतही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परिणामी बेरोजगारीचा आलेख खाली येईल. त्याशिवाय देशभरात शेतीचा विकास साधता येईल. त्यामुळे पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रमाचा समावेश करावा, अशी मागणी शिरपूर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर गजानन ढवळे यांनी मानव विकास संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Agricultural education must be compulsory to class X

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.