ठळक मुद्देसहा वर्षांपासून प्रतिक्षाशासनाच्या शिष्यवृत्ती परिक्षा योजनेचा बोजवारा 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महाराष्ट्र परिक्षा परिषद व्दारा इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांसाठी सन २००९-१० मध्ये घेतलेल्या परिक्षेतील गुणवत्ता प्राप्त मागास विद्यार्थ्यांना गेल्या सहा वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नाही. या विद्यार्थ्यांना त्वरीत शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्यावतीने जिल्हा जिल्हाध्यक्ष पवन राऊत यांच्या नेतृत्वात १३ आॅक्टोंबर रोजी जि.प.शिक्षणाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. याची दखल न घेतल्यास अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. 
महाराष्ट्र परिक्षा परिषदेच्यावतीने २००९-१० मध्ये झालेली शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता प्राप्त मागास विद्यार्थ्यांना व २०१०-११ मध्ये महाराष्ट्र परिक्षा परिषद पुणे व्दारा आयोजीत आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना गेल्या सहा वर्षांपासून अद्यापही शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा. अन्यथा शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने अर्धनग्न मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, शिक्षणमंत्री व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेही  जिल्हाध्यक्ष पवन राऊत, युवक जिल्हाध्यक्ष अनंताकाळे, विनोद पट्टेबहादूर, वैभव एकाडे, बाळासाहेब अंभोरे, प्रमोद चौधरी, शंतनु आंबेकर, विशाल प्रधान, प्रदीप शर्मा, उमेश महल्ले आदिंंची उपस्थिती होती. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.