Adjustment of additional 17 teachers in district district | वाशिम जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या १७ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन!

ठळक मुद्देप्रश्न निकाली: माध्यमिक शिक्षण विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या ३७ शिक्षकांपैकी १७ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन करण्यात आले असून ५ शिक्षकांचे विभाग स्तरावर समायोजन झाल्याची माहिती येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी गुरूवारी दिली.
दरमहा पगार सुरू असला तरी अतिरिक्त ठरल्यामुळे जिल्ह्यातील ३७ शिक्षक हैराण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी विद्यमान शिक्षणाधिकारी नागरे यांनी पुढाकार घेवून संबंधित सर्व शिक्षकांचे प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करून त्यासंदर्भात सलग पाठपुरावा केला. त्यामुळे ३७ पैकी १७ शिक्षकांचे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले असून उर्वरित २० पैकी ५ शिक्षकांचे समायोजन विभागस्तरावरून झाले आहे. याशिवाय १५ शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न देखील लवकरच निकाली निघेन, अशी ग्वाही माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी दिली. 
अतिरिक्त शिक्षकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शक्यतोवर त्यांच्याच तालुक्यात किंवा तालुक्याला लागून असलेल्या दुस-या तालुक्यात शिक्षकांचे समायोजन करण्यात ओल असून अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनू नये, म्हणून शासन नियमानुसारच शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी नागरे यांनी दिली.