चांडस जवळ स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याने फोडली एसटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 06:19 PM2018-07-18T18:19:56+5:302018-07-18T18:23:47+5:30

मालेगाव : स्वभिमानी शेतकरी संघटनेनेच्या कार्यकर्त्यांनी परतवाडा - लोणार  एसटी बस च्या काचा फोडल्याची घटना चार ते साडेच्यार वाजता दरम्यान घडली. 

activist broke st bus near chandas village | चांडस जवळ स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याने फोडली एसटी !

चांडस जवळ स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याने फोडली एसटी !

Next
ठळक मुद्देराज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.चांडस या गावाजवळ परतवाडा लोणार गाडी अडवून गाडीची तोडफोड केली व आंदोलन तीव्र केले.

मालेगाव : स्वभिमानी शेतकरी संघटनेनेच्या कार्यकर्त्यांनी परतवाडा - लोणार  एसटी बस च्या काचा फोडल्याची घटना चार ते साडेच्यार वाजता दरम्यान घडली. 
राज्यातील काही सहकारी खाजगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची वाढ फेटाळून लावले आहे. राज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे . त्याचे पडसाद वाशिम जिल्ह्यातील पाहायला मिळाले असून,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  कार्यकर्त्याने मेहकर रोडवरील चांडस या गावाजवळ परतवाडा लोणार गाडी अडवून गाडीची तोडफोड केली व आंदोलन तीव्र केले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सांगितले की,  दूध भुकटी उत्पादन करणारे कंपनीचे मालकांनीच त्याचे भाव पाडले आहेत.  केंद्राने वेळेवर निर्णय न घेतल्याने हे भाव पडले असून अजूनही भाव वाढू शकतात.  सरकारने गायीच्या दुधाला किमान २७ रुपये भाव जाहीर केला आहे. दूध उत्पादक शेतकºयांना मात्र आज प्रतिलिटर दुधाला केवळ १७ रुपये दर मिळतो आहे. लिटरमागे रोज दहा रुपयांचा तोटा शेतकºयांना सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर भाव व प्रत्यक्ष मिळत असलेले भाव यातील फरक भावांतर योजनेअंतर्गत सरकारने शेतकºयांना सरळ अनुदान देऊन भरून द्यावा, अन्यथा स्वाभीमानी संघटना आणखी उग्र आंदोलन करेल असे सांगितले.

Web Title: activist broke st bus near chandas village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.