राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 02:51 PM2019-07-16T14:51:18+5:302019-07-16T14:51:35+5:30

वाशिम : जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

623 cases disposed of in the National Lok Adalat | राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम जिल्हा न्यायाधीश एस. एम. मेनजोगे होते. यावेळी न्यायिक अधिकारी डॉ. रचना तेहरा, एस. पी. शिंदे, श्रीमती स्वाती फुलबांधे, पी. एस. नेरकर, श्रीमती डॉ. यु. टी. मुसळे, जी. बी. जानकर, एम. एस. पौळ, एस. बी. बुंदे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर मोरे यांच्यासह विधिज्ञ मंडळाचे सदस्य यांची उपस्थिती होती. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभागी होवून आपले वाद तडजोडीने निकाली काढून आपसी संबंध टिकवून ठेवावेत, यावेळी मेनजोगे यांनी केले. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी स्वरुपाची प्रकरणे, हिंदू विवाह कायदा अंतर्गत प्रकरणे, धनादेश विषयक प्रकरणे अशी एकूण ६७९१ दाखल पूर्व आणि न्यायालयात प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. याकरिता ८ पॅनेल तयार करण्यात आले होते. यावेळी ६२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तसेच १ कोटी ७६ लक्ष ९९ हजार ७५२ रुपयांचे निवाडे पारित करण्यात आले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी न्यायिक अधिकारी, वकील संघ, सामाजिक कार्यकर्ते व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. पी. व्ही. पट्टेबहाद्दूर यांनी केले.

Web Title: 623 cases disposed of in the National Lok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.