जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:32 AM2017-11-23T01:32:58+5:302017-11-23T01:42:34+5:30

शासनाने तांडा वस्ती सुधार योजना  कार्यान्वित केली.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली  असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या  निधीची  तरतूद करण्यात आली, अशी  माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार  परिषदेत दिली.

62 works of Tamada Vasti Sudhar Yojana approved in district! | जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजूर!

जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजूर!

googlenewsNext
ठळक मुद्दे३ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा  : मागासलेल्या व अविकसित तांड्यावस्तीचा विकास व्हावा, तेथे मूलभूत सुविधा  प्राप्त होऊन नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने शासनाने तांडा वस्ती सुधार योजना  कार्यान्वित केली.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली  असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या  निधीची  तरतूद करण्यात आली, अशी  माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार  परिषदेत दिली.
स्थानिक विश्राम भवनावर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ते म्हणाले,  की भाजपाचे  जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या  प्रयत्नामुळे व शासन दरबारी  सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे  वाशिम जिल्ह्यात ३१ तांडा  व ३१ वस्ती असे मिळून ६२ कामे मंजूर झाली. त्यासाठी समाजकल्याण विभागाकडून ३  कोटी १५ लाख रुपये निधीची  तरतूद झाली. डी.पी.डी.सी.मार्फत अडीच कोटी रुपये  मंजूर झाली, तसेच शासनातर्फेसुद्धा ३0 टक्के कपात झाली. शासनातर्फेसुद्धा अडीच  कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातील ३0 टक्के  कर्जमाफीसाठी कपात करण्यात आले.  पाच कोटी रुपायांतील ६0 टक्के रक्कम कपात झाली. उर्वरित ३ कोटी १५ लाखांचा  निधी या कामासाठी मंजूर आहे. सदर कामाचे  इस्टिमेट तयार करून संबंधित  गावाच्या  ग्रामपंचायतीने कामे त्वरित सुरू करावी, असेही ते म्हणाले. ही कामे ज्या तांड्यात, वस्तीत  करावयाची आहे, तेथे नामफलक लावावा, जेथे नामफलक दिसणार नाही, तेथील अंतिम  देयक मिळणार नाही, अशा सूचना आपण केल्या आहेत. ज्या तांड्यात, वस्तीत गरज  आहे, तेथेच ही कामे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात टाकण्यात आली आहेत.  तांड्या-वस्तीत एखादा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी जागा नसते म्हणून प्राधान्यक्रम हा  सभागृह बांधण्यावर दिला आहे. त्यासाठी गावाच्या ग्रामसेवकांनी तसे प्रस्ताव सादर केले  पाहिजे. सदरहू कामे दज्रेदार व्हावीत, असा आग्रह आमचा आहे, असेही सुनील महाराज  यांनी सांगितले. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यात एवढय़ा मोठय़ा  प्रमाणात विकास कामे झाल्यानंतर  तांड्याचा,  वसतीचा चेहरामोहरा बदलणार आहे. 
पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, संगायोचे  अध्यक्ष  नीळकंठ पाटील, डॉ.अविनाश  लोथे, वाईगौळचे उपसरपंच जयसिंग राठोड, शेखर  जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: 62 works of Tamada Vasti Sudhar Yojana approved in district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.