वाशिम जिल्ह्यातील ६ हजार शेतकऱ्यांना नाफेडच्या तूर मोजणीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 02:35 PM2019-04-19T14:35:23+5:302019-04-19T14:36:15+5:30

वाशिम: जिल्ह्यातील ६ हजार ६१२ शेतकºयांनी हमीभावाने तूर विक्रीसाठी दोन महिण्यांपूर्वी नाफेडकडे आॅनलाईन नोदणी केली असली तरी आजवर केवळ ३४९ शेतकºयांची तूर मोजणी होऊ शकली आहे.

6000 farmers in Washim district Waiting for the counting of toor | वाशिम जिल्ह्यातील ६ हजार शेतकऱ्यांना नाफेडच्या तूर मोजणीची प्रतिक्षा

वाशिम जिल्ह्यातील ६ हजार शेतकऱ्यांना नाफेडच्या तूर मोजणीची प्रतिक्षा

Next

दहा दिवसोपासून मोजणी बंद : बारदाणाच मिळेना
लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: जिल्ह्यातील ६ हजार ६१२ शेतकºयांनी हमीभावाने तूर विक्रीसाठी दोन महिण्यांपूर्वी नाफेडकडे आॅनलाईन नोदणी केली असली तरी आजवर केवळ ३४९ शेतकºयांची तूर मोजणी होऊ शकली आहे. गेल्या १० दिवसांपासून बारदाणा मिळत नसत्याने तूर मोजणी बंद असून ६ हजार २६३ शेतकरी तूर मोजणीच्या प्रतिक्षेत आहेत. खरीप हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करणारे हे शेतकरी यामुळे मोठया अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यात मालेगाव, वाशिम, रिसोड, मानोरा या चार ठिकाणी नाफेडच्यावतीने हमीभावांत तूर व हरभरा खरेदी सुरू करण्यात आली आहे, तर कारंजा आणि मंगरुळपीर येथे व्हीसीएमएस अंतर्गत तूर व हरभरा खरेदी करण्यात येत आहे. त्यात नाफेडक डे तूर विक्रीसाठी ६६१२ शेतकºयांनी, तर हरभरा विक्रीसाठी ३११ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. त्याशिवाय व्हीसीएमएस अंतर्गत तूर विक्रीसाठी १० हजार ६९६ शेतकºयांनी, तर हरभरा विक्रीसाठी २७४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. यातील व्हीसीएमएस अंतर्गतची खरेदी प्रक्रिया सुरू असली तरी, नाफेडची खरेदी प्रक्रिया बारदाण्याअभावी बंद पडली आहे. आजवर नाफेडने केवळ २४९ शेतकºयांची ४५२५ क्विंटल तूर आणि ५ शेतकºयांचा २५ क्विंटल हरभरा मोजून घेतला आहे. आधीच मोजणीची प्रक्रिया संथ असताना नाफे डकडे माल मोजण्यासाठी बारदाणा नसल्याने ही खरेदी प्रक्रिया बंद पडली आहे. दुसरीकडे व्हीसीएमएसच्या खरेदी प्रक्रियेसाठी पुरेसा बारदाणा उपलब्ध असल्याने मंगरुळपीर आणि कारंजा येथे तूर आणि हरभरा खरेदी सुरू आहे. या दोन ठिकाणी आजवर १८७७ शेतकºयांची  २६ हजार ५७८ क्विंटल मोजण्यात आली आहे.

 

Web Title: 6000 farmers in Washim district Waiting for the counting of toor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.