‘समृद्धी’साठी जमिनी देणाऱ्यांना ४४६ कोटींचा मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:07 AM2018-08-13T06:07:59+5:302018-08-13T06:08:17+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९४३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, अडीच हजार शेतक-यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली.

 446 crores compensation for land for 'prosperity' | ‘समृद्धी’साठी जमिनी देणाऱ्यांना ४४६ कोटींचा मोबदला

‘समृद्धी’साठी जमिनी देणाऱ्यांना ४४६ कोटींचा मोबदला

googlenewsNext

वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठीवाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९४३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, अडीच हजार शेतक-यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली.
महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमधून जाणाºया नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांतील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर शेतजमीन संपादित करावी लागणार आहे. यात वन विभागाची १३४ हेक्टर आणि शासकीय मालकीची ७० हेक्टर जमीन असून, उर्वरित जमीन शेतकºयांची आहे. दरम्यान, अपेक्षित १४०९ हेक्टरपैकी आजमितीस ९४३ हेक्टर शेतजमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित अडीच हजार शेतकºयांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदलादेखील वाटप करण्यात आलेला आहे. नागपूर ते मुंबई हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर विदर्भातील शेती व शेतकºयांच्या विकासाला चालना मिळणार असून, शेती समृद्ध होण्यासाठी हा महामार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्हाही मुंबईसोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत वाशिमहून मुंबईत पोहोचणे शक्य होणार असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविणे शक्य होईल व मालालादेखील चांगला दर मिळेल. विदर्भाच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.

या महामार्गासाठी जमिनीचे संपादन करताना शेतकºयांवर अन्याय होऊ नये, यासाठी सरळ खरेदी पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. त्याचा अपेक्षित फायदादेखील झाला असून, शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत ९४३ हेक्टर जमिनीची खरेदी करून दिली. त्यापोटी त्यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आल्याची माहिती माळी यांनी दिली.

Web Title:  446 crores compensation for land for 'prosperity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.