४२ कोटीतून साकारणार सिंचन विहिरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 03:21 PM2019-07-17T15:21:48+5:302019-07-17T15:21:53+5:30

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात पात्र लाभार्थ्यांना नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्यासाठी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांना ४२ कोटींचा निधी मिळाला आहे.

42 crores funds for Irrigation wells | ४२ कोटीतून साकारणार सिंचन विहिरी !

४२ कोटीतून साकारणार सिंचन विहिरी !

Next

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात पात्र लाभार्थ्यांना नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्यासाठी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांना ४२ कोटींचा निधी मिळाला आहे. या योजनेची अंमलबजावणी तातडीने सुरु करण्याच्या सूचनाही कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करून जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून विशेष घटक योजना सुधारीत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्यात राबविण्यात येत आहे. १.५० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºया अनु.जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरिंग, वीजजोडणी, पंप संच, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच आदी बाबींसाठी जवळपास अनुदान दिले जाते. सन २०१९-२० या आर्थिक वर्षाला सुरूवात होऊन साडेतीन महिने उलटले आहेत. साडेतीन महिन्यानंतर या योजनेंतर्गत सिंचन विहिरी व सिंचन साहित्यासाठी एकूण २७३.६२ कोटी रुपये निधीच्या कार्यक्रम अंमलबजावणीस कृषी व पशुसंवर्धन विभागाने १५ जुलै रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. संबंधित जिल्हा परिषदांना लवकरच निधी वितरीत केला जाणार असून, अंमलबजावणीस वित्तीय मान्यता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून घेण्यात येणार आहे. पश्चिम वºहाडातील वाशिम जिल्ह्यासाठी १५.१५ कोटी, अकोला जिल्ह्यासाठी १० कोटी व बुलडाणा जिल्ह्यासाठी १७.३२ कोटी रुपये मिळणार आहेत. लाभार्थी निवडीसाठी नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर तसेच नवीन विहिर खोदणे ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबींसाठी किमान ०.२० हेक्टर तसेच कमाल ६ हेक्टर क्षेत्र मर्यादा लागू राहणार आहे. कृषी गणनेनुसार जिल्ह्यातील एकूण अनु.जाती प्रवर्गातील शेतकºयांपैकी संबंधित तालुक्यातील सदर प्रवर्गाच्या शेतकºयांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यांचा आर्थिक लक्ष्यांक निश्चित करावा, अशा सूचनाही कृषी विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत.

 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्याला १५.१५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार वाशिम जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.
- प्रल्हाद शेळके,
कृषी विकास अधिकारी
जिल्हा परिषद, वाशिम.

Web Title: 42 crores funds for Irrigation wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.