२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : ऑनलाईन नोंदणीसाठी शाळांना २५ जानेवारीपर्यत मुदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:50 PM2018-01-24T13:50:57+5:302018-01-24T13:53:03+5:30

वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी खासगी शाळांना २५ जानेवारीपर्यत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून, नोंदणीसाठी आता एक दिवस शिल्लक आहे.

25% Free admission process: Online registration for schools up to 25th Jan! | २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : ऑनलाईन नोंदणीसाठी शाळांना २५ जानेवारीपर्यत मुदत !

२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : ऑनलाईन नोंदणीसाठी शाळांना २५ जानेवारीपर्यत मुदत !

Next
ठळक मुद्देदिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. खासगी शाळांना २५ जानेवारीपर्यत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून, नोंदणीसाठी आता एक दिवस शिल्लक आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले.

वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी खासगी शाळांना २५ जानेवारीपर्यत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून, नोंदणीसाठी आता एक दिवस शिल्लक आहे.
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित शाळांना आॅनलाईन नोंदणी करून माध्यम, प्रवेशित क्षमता आदी माहिती सादर करावी लागते. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून या माहितीची खातरजमा झाल्यानंतर विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविली जाते. गतवर्षी वाशिम जिल्हयात एकूण ८२ शाळांनी ऑनलाईन नोंदणी होती. यावर्षी जवळपास ९० शाळांची नोंदणी होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला. २५ जानेवारीपर्यंत शाळांनी ऑनलाईन नोंदणी करावी. त्यानंतर विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले.

Web Title: 25% Free admission process: Online registration for schools up to 25th Jan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.