वाशिम शहरातील १४०० वर्षे जुन्या गोंदेश्वर बालाजी मंदिराच्या जिर्णोध्दारास प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:51 PM2017-12-21T13:51:28+5:302017-12-21T13:52:28+5:30

वाशिम: शहरातील सर्वात प्राचीन व चौदाशे वर्ष जुन्या असलेल्या स्थानिक गोंदेश्वर येथील जुने बालाजी गोविंदराज स्वामी मंदिराच्या जिर्णोध्दार कार्यास सामाजीक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून प्रारंभ झाला आहे. 

1400 years old Gandeshwar Balaji temple of Washim renew work started! | वाशिम शहरातील १४०० वर्षे जुन्या गोंदेश्वर बालाजी मंदिराच्या जिर्णोध्दारास प्रारंभ!

वाशिम शहरातील १४०० वर्षे जुन्या गोंदेश्वर बालाजी मंदिराच्या जिर्णोध्दारास प्रारंभ!

Next
ठळक मुद्देजुने बालाजी गोविंदराज स्वामी मंदिराच्या जिर्णोध्दार कार्यास सामाजीक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून प्रारंभ झाला आहे. या मंदिरात भव्य तिरुपती बालाजीसारखी प्रतिमा असून भगवान विष्णू शेषनागावर झोपलेले असलेली नयनरम्य मुर्ती येथे आहे.मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येत असून आतमध्ये आकर्षक टाईल्स व स्टिल रोलींग करण्यात आले.

वाशिम: शहरातील सर्वात प्राचीन व चौदाशे वर्ष जुन्या असलेल्या स्थानिक गोंदेश्वर येथील जुने बालाजी गोविंदराज स्वामी मंदिराच्या जिर्णोध्दार कार्यास सामाजीक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून प्रारंभ झाला आहे. 

वाशिम हे ऐतिहासिक शहर असून याठिकाणी सर्वात प्राचीन असलेल्या गोेंदेश्वर येथील बालाजी मंदिराच्या विकासाकडे कुणाचेही लक्ष नव्हते. या मंदिरात भव्य तिरुपती बालाजीसारखी प्रतिमा असून भगवान विष्णू शेषनागावर झोपलेले असलेली नयनरम्य मुर्ती येथे आहे. सोबतच राम, लक्ष्मण, सिता यांच्याही भव्य मुर्त्या असून रतनदास तुलसीदास बैरागी, रामप्रसाद रतनदास बैरागी व बैरागी परिवार हे या मंदिराची पुजाअर्चना व देखरेख करीत आहेत. सदर मंदिर हे वाशिमचे वैभव असून या अतिप्राचीन मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय नीलेश सोमाणी यांनी घेतल्यानंतर बालाजी कंस्ट्रक्शन कंपनीचे संचालक रुपेश बाहेती, आयुर्वेद तज्ञ डॉ. दीपक ढोके, सामाजीक कार्यकर्ते गजानन अग्रवाल आदिंनी या कार्याला सर्वप्रथम हातभार लावून जिर्णोध्दार कार्यास प्रारंभ केला आहे. 

मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येत असून आतमध्ये आकर्षक टाईल्स व स्टिल रोलींग करण्यात आले. सदर कार्याकरीता नगरसेवक राजू भांदुर्गे, शिवसेना शहर प्रमुख गजानन भांदुर्गे यांचेही विशेष सहकार्य मिळत आहे. सोबतच मंदिरामध्ये जिर्णोध्दार कार्यात कमल पेन्ट हाऊसचे संचालक श्रीराम राठी व संग्राम राठी, मारवाडी युवा मंचचे प्रांतीय उपाध्यक्ष शैलेश सोमाणी, सामाजीक कार्यकर्ते अनंता रंगभाळ, श्रेया मोमेंटोचे संचालक संदेश बांडे यांनीही सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. दर शुक्रवारी मंदिरात पुजाअर्चना, 

Web Title: 1400 years old Gandeshwar Balaji temple of Washim renew work started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.