१२१ वीज चोरट्यांना १२ लाखांवर दंड; महावितरणची धडक कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 05:55 PM2018-08-19T17:55:30+5:302018-08-19T17:56:43+5:30

जिल्ह्यातील २३ गावांमध्ये २३ पथकांनी १२१ वीज चोरट्यांवर कारवाई करत ५ ग्राहकांना भारतीय विद्यूत कायद्याच्या कलम १२६ (विजेचा गैरवापर) अन्वये; तर उर्वरित ११६ ग्राहकांना कलम १३५ (थेट वीजचोरी) अन्वये एकूण १२ लाख १५ हजार ८२६ रुपये दंड ठोठावला.

12 lakh fine for 121 power thieves; Action of MSEDCL | १२१ वीज चोरट्यांना १२ लाखांवर दंड; महावितरणची धडक कारवाई 

१२१ वीज चोरट्यांना १२ लाखांवर दंड; महावितरणची धडक कारवाई 

googlenewsNext
ठळक मुद्देसहाही तालुक्यांमधील तब्बल २३ ठिकाणी ८५ कर्मचाºयांच्या २३ पथकांनी छापासत्र मोहिम राबविली. ११६ ग्राहकांकडून विविध स्वरूपातील मार्गांनी थेट वीजचोरी केली जात असल्याचे आढळून आले. तर ५ ग्राहकांकडून विजेचा गैरवापर होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वीजचोरी आणि अनधिकृत वीजवापराविरूद्ध महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून ६ ते ११ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यातील २३ गावांमध्ये २३ पथकांनी १२१ वीज चोरट्यांवर कारवाई करत ५ ग्राहकांना भारतीय विद्यूत कायद्याच्या कलम १२६ (विजेचा गैरवापर) अन्वये; तर उर्वरित ११६ ग्राहकांना कलम १३५ (थेट वीजचोरी) अन्वये एकूण १२ लाख १५ हजार ८२६ रुपये दंड ठोठावला. विहित मुदतीत दंड न भरल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर.जी.तायडे यांनी दिली.
जिल्ह्यातील काही गावे वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून, मीटरमध्ये बिघाड करून विजचोरी करित असल्याची माहिती मिळाल्यावरून महावितरणचे अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया यांच्या निर्देशावरून वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा अशा सहाही तालुक्यांमधील तब्बल २३ ठिकाणी ८५ कर्मचाºयांच्या २३ पथकांनी छापासत्र मोहिम राबविली. यादरम्यान ११६ ग्राहकांकडून विविध स्वरूपातील मार्गांनी थेट वीजचोरी केली जात असल्याचे आढळून आले; तर ५ ग्राहकांकडून विजेचा गैरवापर होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यावरून संबंधितांना १२ लाख १५ हजार ८२६ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, विहित मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित ग्राहकांवर भारतीय विद्यूत कायद्यातील तरतूदीनुसार फौजदारी दाखल केली जाईल, असे कार्यकारी अभियंता तायडे यांनी सांगितले.

Web Title: 12 lakh fine for 121 power thieves; Action of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.