नवापूर येथील महिलांनी बनवलेल्या वस्तू गेल्या थेट इटलीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:10 AM2019-07-16T01:10:14+5:302019-07-16T01:10:21+5:30

पालघर तालुक्यातील तारापूर एमआयडीसी जवळील नवापूर गावातील महिलांनी बनवलेल्या वस्तू थेट इटलीला पोहोचल्या आहेत.

 Women made from Navapur recently made items directly to Italy | नवापूर येथील महिलांनी बनवलेल्या वस्तू गेल्या थेट इटलीला

नवापूर येथील महिलांनी बनवलेल्या वस्तू गेल्या थेट इटलीला

Next

बोईसर : पालघर तालुक्यातील तारापूर एमआयडीसी जवळील नवापूर गावातील महिलांनी बनवलेल्या वस्तू थेट इटलीला पोहोचल्या आहेत. इटलीतील मिलान येथे नुकतेच एका प्रदर्शनाचे आयोजन केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील औषध तयार करणाऱ्या लुपिन लिमिटेड या नामवंत कंपनीच्या लुपिन फाउंडेशन आणि ग्रामपंचायत नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्री सशक्तीकरणाच्या’ अनुषंगाने ‘शिलाई मशीन प्रशिक्षण’ नवापूर येथे सुरू केले होते. या प्रशिक्षणाला नवापूर येथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपली गुणवत्ताही दाखवली. याची दखल घेत लुपिन फाउंडेशनने ‘स्त्री स्टाईल’च्या माध्यमातून जॉब वर्क आणून ‘स्त्री स्टाईल’ने ‘वेस्ट आऊट आॅफ बेस्ट’ या कल्पनेखाली लॅपटॉप बॅगा, गॉगल पाऊच, बो, टाय, बॅग, किचन अ‍ॅप्रन अशी विविध कामे दिली.
>३८ महिलांनी केला अ‍ॅडव्हान्स कोर्स
नवापूर ग्रामपंचायत, लुपिन फाउंडेशन आणि स्त्री स्टाईल यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावत महिलांनी ही संधी अथक परिश्रम करून ठरवलेल्या दिवसात पूर्ण केले. इटलीतील प्रदर्शनात याच वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
आतापर्यंत गावातील ९९ महिलांनी बेसिक कोर्स केला असून ३८ महिलांनी अ‍ॅडव्हान्स कोर्स केला आहे. नवापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उदय मेहेर आणि उपसरपंच हेमंत बारी यांनी लुपिन फाउंडेशन आणि महिलांशी संवाद साधून प्रोजेक्ट यशस्वी केला.

Web Title:  Women made from Navapur recently made items directly to Italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.