पाण्यासाठी बिवलपाड्यातील महिला गुजरात राज्यात, प्रश्न सोडवेल त्यालाच मत देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:02 AM2019-03-18T04:02:32+5:302019-03-18T04:03:21+5:30

मोखाडा तालुक्यातील बिवलपाड्याची स्थितीही बिकट असून गुजरात व महाराष्टÑ सीमेवरील या वस्तीवरील महिला पाच किमी अंतरावरील नदीपात्रामध्ये खड्डे करुन आपली तहाण भागवित आहेत.

Women of Bivalpada for water, in Gujarat state, will solve the questions, vote for him only | पाण्यासाठी बिवलपाड्यातील महिला गुजरात राज्यात, प्रश्न सोडवेल त्यालाच मत देणार

पाण्यासाठी बिवलपाड्यातील महिला गुजरात राज्यात, प्रश्न सोडवेल त्यालाच मत देणार

Next

- रविंद्र साळवे

मोखाडा - तालुक्यातील बिवलपाड्याची स्थितीही बिकट असून गुजरात व महाराष्टÑ सीमेवरील या वस्तीवरील महिला पाच किमी अंतरावरील नदीपात्रामध्ये खड्डे करुन आपली तहाण भागवित आहेत. तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रु प धारण केले असुन ५० गावपाड्यांना पाण्याचा टँकरने पुरवठा होत आहे.

नदीपात्रातील या खड्ड्यातुन पाणी भरायचे म्हणजे दिवसभर कामधंद्यावर न जाता पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आमच्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीचें दुर्लक्ष निवडणुकीत मत मागायला आल्यावर जो पक्ष आमचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्यांनाच आम्ही मतदान करू असे मत अनिता वाजे या तरु णीने लोकमतशी बोलताना सांगितले.

बिवलपाडा हे अतिदुर्गम आणि डोंगर-दरी च्या कुशीत वसलेले शतप्रतिशत आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे. या गावाच्या दोन्ही बाजुने नदीचे पाणी असुन उर्विरत दोन बाजुने डोंगर असल्याने येथील जनता आजही विकासापासुन वंचित आहेत. या गावाची लोकसंख्या १९० च्या जवळपास असुन ३५ घरांची लोकवस्ती आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही किमान मुलभुत सुविधांना सुद्धा येथील जनता वंचित आहे. पाणी टंचाई येथील कायमची समस्या असून निमृलनासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या निधीतुन विहिरी बांधल्या आहेत. मात्र, त्या बांधताना जमीनीचा पोत व पाण्याच्या उपलब्धते विषयी शास्त्रीय परिक्षण न झाल्याने त्यांत एक थेंबही पाणी नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे झालेला लाखो रुपये खर्च ठेकेदारांच्या खिशात गेला आहे.

रोजगार कागदावर; रस्तेही मातीचे

गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला रोजगार हमीची काम मिळत नसल्याने आम्ही दरवर्षी स्थलांतरित होतो असे ही लहू वाजे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करण्यात आलेला डांबरीकरण रस्ता धामोडी गावाच्या पुढे बिवलपाडयाला पोहचण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर अंतरावर अर्धवट असल्याने गावात गाडी येऊ शकत नाही.
दोन वर्षांपूर्वी एम.आर.जी.एस योजने अंतर्गत मातीचा भराव टाकुन करण्यात आलेला रस्ता पावसाच्या पाण्याने दरवर्षीच वाहुन जात असल्याने या गावात जाण्यासाठी जंगलातील पायवाटेचा आधार घ्यावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप राऊत यांनी सांगितले.

बिवलपाडा गावाची काय स्थिती आहे याबाबत आदेश देऊन पहाणी करण्यात येईल. तसेच, त्याठिकाणी रोजगार हमीचे कामे का उपलब्ध केली जात नाही याचीही विचारणा करणार आहे. कोरड्या विहिरींची पहाणी करुन निधीचा अपव्यय केला असेल तर त्याची चौकशी करू!
- मिलिंद बोरीकर, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प. पालघर

डोली बांधून होते रुग्णसेवा
बिवलपाड्यासाठी आरोग्यसेवा फक्त कागदावर असून गावकरी लहू वाजे यांनी सांगितले की, गावात जर एखादा व्यक्ती जास्तच आजारी असल्यास रात्रीच्या वेळी सर्व गावकरी चादरीची डोली बांधुन रुग्णाला दहा किलोमीटर अंतरावरील आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेतात.

Web Title: Women of Bivalpada for water, in Gujarat state, will solve the questions, vote for him only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.