Will the problems of Mokhadasis be solved this year? | यंदा तरी मोखाडावासीयांच्या समस्या सुटतील का?

मोखाडा : शासन पातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास अजतायत संपलेला नाही. यामुळे या नवीन वर्षात तरी मोखाडा वासीयांच्या रोजगार, आरोग्य, पाणी, कुपोषण, शिक्षणाच्या समस्यां सुटतील का असा प्रश्न येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे
स्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटली असताना येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी , वीज, इत्यादी मूलभूत सुविधां पासून येथील भूमिपुत्र कोसोदूरच आहे. इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथील भूमिपुत्र वर्षानुवर्ष स्थलांतरित होत आहे दिवाळीचा सणाचा आनंद मावळताच येथील आदिवासी रोजगाराच्या शोधात आपल्या अठरा विश्व दारिद्र्याचे गाठोडे बांधून शहराकडे रवाना झाला आहे
येथील कुपोषण तर पाठ सोडायला तयार नाही दरवर्षीच कुपोषण बळीच्या अनेक घटना घडत असल्याने कुपोषण निर्मूलनाचा दावा करणारे प्रशासन अपयशी ठरले आहे कुपोषणाचे प्रमुख कारण रोजगार असल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे परंतु तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे कायम स्वरूपी रोजगार देणारी कसलीच यंत्रणा येथे उपलब्ध नाही केलेल्या कामाचा मोबदला वर्षवर्ष होऊनही मिळत नाही
शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब जीर्ण झाले असल्याने विज सेवेचा नेहमीच लफंडाव असून त्यातच सततचे भारिनयमन व वाढीव बिल आकारणी यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे तालुक्याच्या ठिकाणी असलेले एकमेव ग्रामीण रु ग्णालय व आरोग्य केंद्रात सोईसुविधा मिळत नसल्याने खाजगी रु ग्णालयातील महागडा उपचार घ्यावा लागत आहे.
रुग्णांना उपचारासाठी नाशिक मुबंई ठाणे धाव घ्यावी लागते मोखाद्यात पाच मोठी मोठी धरणे असून देखील दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे शिक्षण ज्ञानाचा तिसरा डोळा असे सांगितली जात असले तरी येथे रयतचे महाविद्यालाय आण िखोडाळ्याचे मोहिते कॉलेज सोडले तर इतर शिक्षणाची कोणतीच सोय नाही यामुळे येथील आदिवासी मुलांना नाशिक वसई पुणे मुबंई ठाणे येथे शिकायला जावे लागते.
सार्वजनिक बांधकाम रस्ते विकासाच्या नावाखाली करोडोचा दरवर्षी खर्च करते तरी देखि खोडाळा मोखाडा जव्हार त्रिंबकेश्वर या मुख्य रस्त्याची दुरावस्थेत फारसा बद्दल झालेला नाही- मोखाडा तालुक्याचे ठिकाण असूनही येथे मनोरंजनाचे साधन नाही चित्रपटगृह नाही येथील परिसर डोंगर दर्या खाºयांनी नटलेला आहे. देवबांधचे गणपतीचे मंदिर अशोका धबधबा वाशाळा येथील बुद्ध लेणी पेंडक्याची वाडी येथील कमाणीचा धबधबा व प्राचीन वास्तू अशा विविधतेने हा परिसर नटलेला असून देखील प्रशासनाने पर्यटनासाठी प्रयत्न केलेले नाहीत यामुळे येथील आदिवासी आजही दारिद्याच्या काळोखातच चाचपडत असल्याने यामुळे या नवीन वर्षात तरी सोईसुविधा पुरवण्याचा शहाणपण येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना सुचेल का हा प्रश्न आहे.

विकास कुठे गेला?
तालुक्यातील बिवलपाडा रुईपाडा फनसपाडा कुर्लोद सावर्डे कुडवा अशा विविध गावपाड्यांना अजून पर्यंत शासनाच्या कोणत्याच सोईसुविधा पोहचलेल्या नसून काही गावपाड्यांना विजेचा प्रकाश बघायला सुद्धा मिळालेला नाही. यामुळे डिजटल इंडिया, बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया, म्हणजे काय रे भाऊ असाच सवाल विचारला जात आहे.