Will hold 18 lakh voters for Palghar | पालघरसाठी १८ लाख मतदार हक्क बजावणार
पालघरसाठी १८ लाख मतदार हक्क बजावणार

पालघर : पालघर (अज) मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून १८ लाख १२ हजार ९८३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ९ लाख ४९ हजार ५९२ पुरूष, ८ लाख ६३ ३०१ महिला तर ९० तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणीची प्रक्रि या सुरू असल्याने यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

१ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित पालघर लोकसभा मतदारसंघामधील विधानसभा मतदार संघाच्या १२८-(अज)डहाणू मतदार संघात एकूण १ लाख ३४ हजार १०४ पुरु ष तर १ लाख ३१ हजार ७७६ महिला तर तृतीयपंथी ६ अशा एकूण- २ लाख ६५ हजार, ८८६ मतदार आहेत. १२९ (अज)-विक्र मगड मतदारसंघात एकूण १ लाख ३१ हजार ४१६ तर १ लाख २७ हजार, ९१६ असे एकूण- २ लाख ५९ हजार ३३२ मतदार आहेत. १३० (अज) पालघर मतदार संघात १ लाख, ३५ हजार, २२४ पुरु ष तर, १ लाख ३० हजार ५३७ महिला, तृतीयपंथी- १२ असे एकूण- २ लाख ६५ हजार ७७४ मतदार आहेत. १३१ (अज) बोईसर मतदार संघात १ लाख ४८ हजार ०७९ पुरुष तर १ लाख २७ हजार ५९५ महिला तर तृतीयपंथी- २४ असे एकूण- २ लाख ७५ हजार ६९८ मतदार आहेत. १३२ (सर्वसाधारण) नालासोपारा मतदार संघात एकूण २ लाख ५४ ह जार, ७१७ पुरु ष, २ लाख ०८ हजार ०६५ महिला तर तृतीयपंथी ४४ असे एकूण- ४ लाख ६२ हजार ८२६ एवढे सर्वाधिक मतदार आहेत. आणि वसई मतदार संघात एकूण १ लाख, ४६ हजार ०५२ पुरु ष तर १ लाख ३७ हजार ४१२ महिला, तृतीयपंथी ३ असे एकूण-२ लाख ८३ हजार ४६७ मतदार आहेत.

मतदारांची टक्केवारी
पालघर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या अंदाजित लोकसंख्येच्या तुलनेत पुरूष मतदारांचे प्रमाण ७१.७६ टक्के, महिलांचे प्रमाण ७३.९४ टक्के असे एकूण ७२.७९ टक्के आहे. डहाणूमध्ये एकूण- ७१.८० टक्के. विक्र मगड- ६७ टक्के. पालघर- ७२.१० टक्के. बोईसर- ७३.८१ टक्के. नालासोपारा- ७६.७६ टक्के आणि वसईमध्ये एकूण- ७२.९९ टक्के असे हे प्रमाण असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालया कडून देण्यात आली.


Web Title: Will hold 18 lakh voters for Palghar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.