पक्षापेक्षा आम्हाला काम करणारा खासदार हवा! वैतागलेल्या डहाणूकरांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 04:01 AM2019-03-19T04:01:26+5:302019-03-19T04:02:20+5:30

पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने शिवसेनेसाठी जागा सोडली आहे. त्यामुळे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा क्षेत्रातुन भाजपकडून तलासरी, डहाणू भागातून जाहीर विरोध होऊ लागला आहे.

We want an MP working for us! The wretched dahaukar's tomorrow | पक्षापेक्षा आम्हाला काम करणारा खासदार हवा! वैतागलेल्या डहाणूकरांचा कल

पक्षापेक्षा आम्हाला काम करणारा खासदार हवा! वैतागलेल्या डहाणूकरांचा कल

Next

- शौकत शेख

डहाणू  - पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने शिवसेनेसाठी जागा सोडली आहे. त्यामुळे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा क्षेत्रातुन भाजपकडून तलासरी, डहाणू भागातून जाहीर विरोध होऊ लागला आहे. तलासरी येथे जाहीर सभेत आदिवासी आघाडी प्रसिद्धी प्रमुख यांनी भाजपाला ही जागा न सोडल्यास अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

डहाणू विधानसभा, पंचायत समिती, डहाणू नगर परिषद, ग्रामपंचाती भाजपाकडे आहेत. त्यामुळे भाजपाकडुन पालघर लोकसभा लढण्याची तयारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पुर्ण झाली होती. मात्र वरच्या स्तरावर शिवसेनेकडे माप झुकल्याने येथील मतदार या पक्षीय राजकारणाला मोल देतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण लोकांना निवडणुकीपेक्षा रोजगाराचा प्रश्न महत्वाचा वाटू लागला आहे त्यामुळे बेरोजगारी, उद्योगबंदी, शिक्षण आदि समस्या सोडवणाऱ्या खासदाराच्या शोधात डहाणूचे मतदार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकसभेचे बिगुल वाजले आणि पालघर लोकसभेची जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडली असली तरी रविवारी तलासरी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेनेला विरोध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपाने ही जागा शिवसेनेला सोडू नये असा एकमुखी ठराव घेण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हेवेदावे समोर येऊ लागले आहेत. डहाणू विधानसभा मतदार संघाचा प्रभाव लाक्षणिक ठरणारा आहे. पालघर लोकसभा युतीने शिवसेनेला सोडली आहे. यामध्ये डहाणू विधानसभेत भाजपाचे वर्चस्व आहे. त्याचा फायदा शिवसेनेला होणारा आहे. उद्योगबंदीमुळे लोकांना रोजगारासाठी वणवण करावी लागत आहे. त्यातच आहे त्या उद्योगांचे स्थलांतर होवू लागल्याने लोकांना स्थलांतर करण्याची वेळ ओढवली आहे. अपेक्षित कामधंदा मिळत नसल्याने तरूण वर्ग सैरभर झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँगेस आणि सीपीएम यांचे प्रभावक्षेत्र मानले जाणारे डहाणू, तलासरी तालुके कष्टकऱ्यांची नगरी परिचित आहे. डहाणू समुद्र किनारपट्टीवरील क्षेत्राच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून झालेली बांधकामे नियमित करण्याची जुनी मागणी आहे. मात्र त्याची उकल होत नाही हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. डहाणूमध्ये गेल्या २५ वर्षात उद्योग बंदी असल्याने एकही कारखाना सुरू झालेला नाही परिणामी मोलमजुरीचे काम करणारे आदिवासी दरवर्षी वीटभट्टी तसेच बोटीवर कामासाठी बाहेर पडावे लागते.

२५ वर्षे उद्योगबंदी अन् रोजगाराचा अभाव

२००९ मध्ये डहाणू विधानसभेत माकपचे राजाराम ओझरे निवडुन आले होते. त्यानंतर भाजपचे पास्कल धनारे निवडुन आले आहेत. त्यामुळे सध्या विद्यमान आमदारांचा प्रभाव असलेल्या डहाणू विधानसभेत विकासकामे झाली असली तरी १९९१ पासून डहाणू तालुक्याला लागलेली उद्योगबंदी २५ वर्षात उठलेली नाही. परिणामि स्थलांतर, रोजगार, उद्योगबंदी, यामुळे जनतेत सरकारचा रोष पसरला आहे. त्यामुळे डहाणूत समस्या सोडवणार्या खासदाराच्या शोधात मतदार राजा असल्याचे चित्र आहे.
 

Web Title: We want an MP working for us! The wretched dahaukar's tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.