१५ लाखांची तरतूद तरी पाण्याच्या टाक्या अस्वच्छ; शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 05:00 AM2018-04-22T05:00:32+5:302018-04-22T05:00:32+5:30

टाक्या स्वच्छ करण्यासाठी १५ लाख रूपयांची तरतुद गेल्या अंदाज पत्रकात केली असूनही हा निधी वापरला गेलेला नाही

Water tanks are stagnant despite provision of 15 lakhs; The charge of Shivsena | १५ लाखांची तरतूद तरी पाण्याच्या टाक्या अस्वच्छ; शिवसेनेचा आरोप

१५ लाखांची तरतूद तरी पाण्याच्या टाक्या अस्वच्छ; शिवसेनेचा आरोप

Next

विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पाणी साठवण टाक्या पावसाळयापूर्वी साफ करण्याची मागणी शिवसेनेने महापालिकेकडे केली आहे. गेले वर्षभर पाण्याच्या टाक्या साफच करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे़ महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
टाक्या स्वच्छ करण्यासाठी १५ लाख रूपयांची तरतुद गेल्या अंदाज पत्रकात केली असूनही हा निधी वापरला गेलेला नाही असे सांगण्यात आले. वसई - विरार महापालिका क्षेत्रात सूर्या पाणीपूरवठा योजना, उसगाव धरण आणि पेल्हार धरणातून २३० दशलक्ष लीटर पाणीपूरवठा केला जातो. मुख्य जलवाहिनीतून हे पाणी शहरात आल्यानंतर साठवण टाकीत येते.Þ त्यानंतर या पाण्याचे वितरण शहरात केले जाते.
सध्या शहरात ३५ साठवण टाक्या आहेत. या शिवाय १८ नवीन टाक्यांचे काम सुरू आहे. त्यातील ५ टाक्या पूर्ण होत आल्या आहेत. सध्या ३५ साठवण टाकीतून नागरिकांना पाणी पूरवले जाते. दर तीन महिन्यांनी या टाक्या स्वच्छ करणे बंधनकारक असते Þमात्र, मागील दोन वर्षांपासून या साठवण टाक्या स्वच्छ केल्या नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या स्थितीमुळे नागरिकांना गढूळ आणि दूषित पाणी मिळत असून, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.

आदेशाला केराची टोपली
वसई पूर्वेकडील प्रभागात असलेली साठवण टाकी स्वच्छ करण्यात आलेली नव्हती. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती.
साठवण टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश शहर अभियंत्यांनी काढले तरी देखील टाक्या स्वच्छ करण्यात आल्या नाहीत, असे गटनेत्या स्वाती चेंदवणकर यांनी सांगितले.

Web Title: Water tanks are stagnant despite provision of 15 lakhs; The charge of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.