नालासोपाऱ्यात पाणी महागले; खाजगी पाणीकंपन्या आणि टँकरवाल्यांकडून सर्वसामान्यांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:15 AM2019-05-20T00:15:25+5:302019-05-20T00:15:30+5:30

टंचाईच्या काळात आर्थिक लूट

Water in inflation; private water companies and tankers behind that | नालासोपाऱ्यात पाणी महागले; खाजगी पाणीकंपन्या आणि टँकरवाल्यांकडून सर्वसामान्यांची पिळवणूक

नालासोपाऱ्यात पाणी महागले; खाजगी पाणीकंपन्या आणि टँकरवाल्यांकडून सर्वसामान्यांची पिळवणूक

Next

नालासोपारा : उन्हाळा आला की नालासोपाराकरांची पाण्यामुळे तारांबळ होत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी व घरगुती वापरासाठी आवश्यक असणारे पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी मैलोंमैल पायपीट करावी लागते. गेल्या ४ ते ५ दिवसापासून वसई विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाºया सूर्या जलवाहिनीच्या पावसाळा पूर्व दुरूस्तीचे काम सुरू असल्याने तालुक्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती आहे. काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असल्याने पाण्याच्या खाजगी कंपन्या व टॅँकरवाल्याचे उखळ पांढरे होत आहे.


सध्या सुरु असलेल्या टंचाईचा गैरफायदा घेत टँकर वाले अव्वाच्या सव्वा पैसे घेवून लोकांची फसवणूक करीत आहेत. काही सोसायटीचे टँकर वाले ठरलेले असून त्यांचा आठशे ते एक हजार रुपये येवढा दर ठरलेला असतो. महानगरपालिकेकडून पाणी सुरळीत मिळत नसल्याचा गैरफायदा घेत हेच टॅँकरवाले सध्या १८०० ते २००० रुपये प्रति टॅँकर वसूली करीत आहेत. तर शुद्धपाण्याच्या नावाखाली व्यवसाय करणाºया काही खाजगी कंपन्या एरवी ३० रूपयाला २० लीटर तर काही कंपन्या ४० रूपयाला २० लीटर पाणी देताता मात्र, सध्याच्या काळात २० लिटर पाणी ५० रु पयाला देऊन सामान्य नागरिकांना पाण्याच्या नावावर अक्षरश: लुटत आहे. यावर महापालिकेने अंकुश लावावा.

टँकर लॉबीचा धंदा तेजीत...

नालासोपारा मध्ये अंदाजे २०० ते ३०० टँकर आहेत. हे टँकर बाधकामाना पाणी पुरवतात. आता लोकांना मनपाचा पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे अव्वाच्या सव्वा पैसे घेवून लोकांना टँकर पुरवत आहेत. ८०० ते १००० रु पयांच्या टँकरसाठी आता ते १८०० ते २००० रुपये घेत आहेत. त्यामुळे या टँकर लॉबिचा धंदा तेजीत आहे. दरम्यान, मागणी ऐवढी आहे की, त्यांना आगावू कल्पना दिली तरच विकतचे पाणी मिळते अन्यथा नाही.

गेले ४ दिवस दुरु स्तीमुळे पाणीपुरवठा कमी दाबाने...
वसई विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाºया सुर्या धरणाच्या जुन्या योजनेची पाईप लाईनला वरई फाटा, ढेकाळे, वाघोबा खिंड, सकवार आणि खानिवडे या ठिकाणी गळती असून पावसाळ्याचा काळ पाहता १५ मे रोजी सकाळी ९ ते १६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत केली होती. नंतर, पुन्हा वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाºया सुर्या धरणाच्या नवीन योजनेच्या धुकटन (पालघर) येथील जलशुद्धीकरण केंद्रा मध्ये तांत्रिक दुरु स्तीसाठी १७ मे रोजी सकाळी ४ पासून १८ मे रोजी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

पिण्यासाठी मनपाचे पाणी कमी येत असल्यामुळे टँकरचे पाणी सोसायटीत येते. पण आता टँकर महाग झाल्याने करायचे काय ? मनपाने पाणी पुरवठा सुरळीत केला तर महाग झालेले टँकरचे पाणी स्वस्त होऊन सामान्य नागरिकांना भेटेल.
- मालती शिंदे. विजय नगर, नालासोपारा
आॅफिसला पिण्याचे पाणी हे खाजगी कंपणीद्वारे मागविले जाते. २० लिटर पाण्याला पूर्वी ३० रु पये दर होता. आता दोन दिवसापासून २० लिटर पाण्याला ६० रु पये मोजावे लागत आहे ही पिळवणूक आहे.
- सतीश पटेल, इस्टेट ऐजेन्ट, नालासोपारा पूर्व)
कमी दाबाने मनपाचे पाणी येत असल्यामुळे व पाणी पिण्यासाठी पुरत नसल्यामुळे सोसायटीत टँकर मागवतो. पूर्वी प्रती टॅँकर ९०० रु पये दराने पाणी देत असे पण आता या महिन्यापासून टँकरचे पैसे १६०० रु पये झाल्याने सर्व घरांना मेंटनेस जास्त मोजावे लागत आहे.
- अनिता प्रभू (स्थनिक रहिवाशी)

Web Title: Water in inflation; private water companies and tankers behind that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.