पाणी ओसरले पण नुकसान मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:49 AM2018-07-13T02:49:19+5:302018-07-13T02:49:30+5:30

वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे.

Water flips but damages bigger | पाणी ओसरले पण नुकसान मोठे

पाणी ओसरले पण नुकसान मोठे

Next

विरार : वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी कचºयाचे ठिग वाढले आहेत. पाण्यासोबत लोकांच्या घरात, सोसायटीत कचरा गेल्याने घाणीच्या समस्येला नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. सतत पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावर कचरा साचून राहिल्याने अस्वच्छता व दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे.
ज्या ठिकाणी पालिकेच्या गाड्या जाणे शक्य आहे. तेथील कचरा पालिकेच्या सफाई कर्मचाºयांनी उचला आहे. मात्र, अनेक ठिकाणी कुजलेला भाजीपाला व अन्य कचरा साचलेल्या पाण्यात कडून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीचे आजार देखील मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असल्याने महापालिकेने तातडीने त्यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
जवळपास ३० लाख लोकसंख्या असल्येल्या शहरात गेल्या ३ दिवसापासून लागातार पाऊस झाल्याने सर्वच यंत्रणांची परीक्षा झाली. दुकानात ग्राहक नसल्याने दुकानदारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचसोबत दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भिजलेले सामान फुकून देण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. तसेच अनेक ठिकाणी सोसायटीच्या टाक्यांमध्ये दुषीत पाणी गेल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
वसई तालुक्यात अनेक ठिकाणी जवळपास ३६ तास लाईट नव्हती. त्यामुळे लोकांना अजूनच त्रासाला सामोरी जावे लागले होते.

पोलीस आणि पालिका कर्मचाºयांची मोठी कसरत

वीज नसल्याने मोबाईल सेवा देखील ठप्प झाल्या होत्या. सर्वत्र पाणी भरल्याने लाईट बंद ठेवली गेली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी मीटरमध्ये पाणी गेल्याने पाऊस गेल्यानंतर देखील मीटर खराब झाल्याने लाईट आली नव्हती.

महापालिकेच्या कर्मचाºयांनी अगदी २४ तास न झोपता काम केले. त्याचबरोबर पोलीस देखील मुसळधार पावसात २४ तास काम करत होते. अनेक ठिकाणी पावसात बंद पडलेल्या गाड्या हलवण्याचे काम देखील पोलीस करत होते. नागरिकांचे सेवेसाठी त्यांनी मोठी कसरत केली

Web Title: Water flips but damages bigger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.