मोफत गणवेशाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 02:21 AM2018-08-15T02:21:38+5:302018-08-15T02:23:01+5:30

सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१८/१९ या शैक्षणिक वर्षी इयत्ता पहिली ते आठवी शिकणाऱ्या अनुसुचित जाती-जमाती आणि द्रारिदय रेषेखालील विद्यार्थी-विद्यार्थीनींना मोफत गणवेश देण्याची योजना आहे.

Waiting for students of free uniform | मोफत गणवेशाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षाच

मोफत गणवेशाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षाच

Next

विक्रमगड : सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१८/१९ या शैक्षणिक वर्षी इयत्ता पहिली ते आठवी शिकणाऱ्या अनुसुचित जाती-जमाती आणि द्रारिदय रेषेखालील विद्यार्थी-विद्यार्थीनींना मोफत गणवेश देण्याची योजना आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना दोन गणवेषासाठी ६०० रुपये दिले जाणार होते. ते त्याच्या खात्यात जमा होणार होते. परंतु विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा घोळ लक्षात घेऊन हे पैसे आता शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. परंतु ते अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती पडलेले नाहीत.
विक्रमगड तालुक्यात २३५ शाळा असून त्यातील १६ हजार ३०४ विद्यार्थ्यांचे एका गणवेशाचे तीनशे रुपये प्रमाणे ४८ लाख ९१ हजार २०० रुपये हे शाळाव्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा झाले असले तरी या पैशातून प्रत्येक शाळा लगेचच गणवेश घेईलच असेल असे नाही कारण हे पैसे तीन ते चार दिवसापूर्वीच जमा झालेत त्यामुळे सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच असेल असे नाही त्यामुळे उद्या होणाºया स्वातंत्र्य दिनाला विद्यार्थ्यांना आपला जुनाच गणवेश परिधान करावा लागणार आहे .
हे पैसे एक आठवड्यापूर्वी मिळाले असते तर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनी नविन गणवेश परिधान करता आला असता अशी प्रतिक्रि या कॉ. किरण गहला यांनी दिली आयत्यावेळी गणवेश कुठून आणणार? याबाबत गटविकास अधिकाºयांना विचारले असता पैसे ते उशीरा आले म्हणून समितीच्या खात्यावर पैसे उशीरा जमा झाले तरीही काही शाळानी उधारीवर गणवेश आणल्याचे सांगितले .
विद्यार्थ्यांच्या हाती पैसे दिले तरी आदीवासी मातापिता त्यातून गणवेष घेतीलच याचीही कोणतीच शाश्वती नाही.

पी. टी.चे ड्रेस आश्रमशाळेत पडून

पालघर : आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांच्याकडील 33 शासकिय आश्रमशाळांकरीता सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात पी. टी. ड्रेसचा पुरवठा मार्च 2018 मध्ये करण्यात आला होता. मात्र त्याचे वाटप अद्याप न केल्यामुळे ते आश्रमशाळांत गेल्या 5 महिन्यांपासून धूळ खात पडलेले आहेत. त्याचे वाटप करणार तरी कधी? असा सवाल येथील पालक व विद्यार्थी करीत आहेत.
डहाणू प्रकल्पातील एकूण 33 आश्रमशाळेतील जवळ जवळ 16 हजार विद्यार्थ्यांना स्पोर्टस् पी. टी. ड्रेसचा पुरवठा करण्याकरीता ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या, त्याची खरेदी थेट वर्षा अखेरीस म्हणजे मार्च 2018 या महिन्यात, करण्यात आली. त्याचा मार्च 2018 मध्ये आश्रमशाळांना पुरवठाही करण्यात आला, मात्र ते 2018-19 या शैक्षणिक वर्षात वाटप करण्याबाबत कार्यालयाकडून मौखिक रुपात सांगण्यात आले. मात्र त्याचे अद्याप वाटप करण्यात आले नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सन 2017-18 च्या खरेदीचे ड्रेस सन 2018-19 मध्ये का वाटप केले जात आहेत ? तसेच ड्रेस वाटप करण्यात इतका विलंब का होत आहे ? ड्रेस वेळेवर का वाटप केले जात नाहीत? याबाबत अद्याप कुठलाच खुलासा नाही.

Web Title: Waiting for students of free uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.