विक्रमगडला भुरट्यांंची दहशत, पोलिसांना येत आहे अपयश, गस्त वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:26 AM2017-11-20T02:26:11+5:302017-11-20T02:26:26+5:30

विक्रमगड : गेल्या काही महिन्यांपासुन विक्रमगड षहराच्या बुधवारच्या आठवडी बाजारामध्ये भरटया चोरांची दहशत वाढली

Vikramgarh is facing panic attack, police is facing failure, patrol demand | विक्रमगडला भुरट्यांंची दहशत, पोलिसांना येत आहे अपयश, गस्त वाढविण्याची मागणी

विक्रमगडला भुरट्यांंची दहशत, पोलिसांना येत आहे अपयश, गस्त वाढविण्याची मागणी

Next

राहुल वाडेकर 
विक्रमगड : गेल्या काही महिन्यांपासुन विक्रमगड शहराच्या बुधवारच्या आठवडी बाजारामध्ये भरटया चोरांची दहशत वाढली असून यामध्ये जास्त लहान मुलांचा (१२ ते १५ वर्षाच्या) समावेश आहे़. ही मुले महिलांवर वॉच ठेवतात व त्यांनी काहीही खरेदीकरीता आपली पर्स बाहेर काढली की त्यांच्यावर अ‍ॅटॅक करुन पर्स पळवून नेतात. मुले लहान असल्याने ती पटकन नाहीशी होतात़ गेल्या दोन दिवसांपूर्वी विक्रमगड शहराचा बुधवारी आठवडी बाजारात पाच महिलांच्या पर्स अशा रितीने चोरण्यात आलेल्या आहेत व असेच प्रकार वाढीस लागलेले आहेत. याबाबत एपीआय विश्वास पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की अजून दोन पोलिसांची गस्त वाढवून या भुरटया चोरांवर लक्ष ठेवले जाईल़
दरम्यान यापूर्वी देखील विक्रमगड शहर परिसरात वारंवार मोबाइलची दुकाने फोडून तसेच घरफोडी करण्याचे प्रकार वाढलेले होते. या टोळीला पकडण्यात अजून पोलिसांना यश आलेले नाही.
एक वर्षापूर्वी चो-यांचे अधिक होते त्यामुळे शहराच्या चारही कोप-यांमध्ये पोलिसांची गस्त वाढविली होती मात्र कालांतराने गस्त कमी झाल्याने चोºयांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. तसेच अलिकडे जरीमरीनगर परिसरसत घरफोडया करुन चोरटयांनी चांदी सोने, रोख रक्कम अशी मिळून जवळ जवळ २ लाख १८ हजाराचा एैवज लंपास केला आहे.
तसेच यतीन घरत, रघुनाथ दुपारी व जनार्दन पाथरवट यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या कानाकोप-यांमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे
गतवर्षी देखील याच पहील्याच आठवडयात एकाच रात्रीमध्ये याच जरीमरी नगर परिसरात जवळजवळ सहा ठिकाणी घरफोडया झाल्या होत्या. चोरी करणारे इसम प्रथम परिसराची टेहळणी करुन माहिती काढून त्याप्रमाणे रात्रीे ज्या घरास कुलूप आहे़
त्या घरात चोरी करायची व आजूबाजूला असलेल्या घरांच्या कड्या बाहेरुन लावून घ्यायचे. यावेळी मात्र यतीन घरत हे चोर घरामध्ये असतांनाच लग्नाहून परत आले होते परंतु त्याचे बरोबर घरातील महिला असल्याने त्यांना काहीच करता आले नाही मात्र चोरांनी घरत यांचा गाडीचा आवज ऐकल्याने पळ काढला मात्र चोरांना पळतांना त्यांनी पाहीले परंतु ते त्यांना ओळखू शकले नाही़
>गस्त वाढवा
सद्यस्थितीत विक्रमगडमध्ये पोलिसांची गस्त वाढली पाहीजे कारण मोबाइल दुकाने फोडणे, घरफोड्या, सायकल, पेट्रोल, मोटरसायकल यांच्या चोºया वाढल्या आहेत़ यामधील आरोपी पोलिसांच्या हाती अदयापही लागलेले नाही़. यामुळे आता पोलिस व नागरिकांनी सतर्क राहून चोरटयांना जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक जनतेकडून होते आहे़
>विक्रमगड शहराच्या बुधवारी आठवडी बाजारात लहान मुलांकडून भुरटया चो-या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. एखादी महिला वस्तू खरेदी करीतांना पर्स हातामध्ये ठेवताच ती लंपास करण्याचे प्रकार होत आहे़ त्यामुळे महिलांनी देखील पोलिसांच्या भरवशावर न राहता सतर्क राहून चोरटयांना धडा शिकविला पाहिजे. आता आपल्यालाच खंबीर होण्याची गरज आहे़
-अनिता पाथरवट, जरीमरी नगर विक्रमगड
नागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी पोलिस ठाण्याला माहिती देणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर आपल्या घराची दारे-खिडक्या काळजीपूर्वक बंद करणे, सिक्युरिटी नेमतांना त्याची संपूर्ण पार्श्वभूमी, माहित करून घ्या, भाडेकरु ठेवतांना माहितीतलाच ठेवा. याबाबतची नोंद तरी पोलिस ठाण्यात करा. पोलिसांबरोबरच जनतेनेही जागरूक व सतर्क राहीले पाहिजे़ बाहेरगावी जातांना मौल्यवान वस्तू, दाग-दागिने घरात ठेवू नये़ तसेच बाजारामध्ये फिरतांना आजूबाजूला लक्ष ठेवावे. पर्समधील पैसे काढतांना सतर्क राहावे़
- विश्वास पाटील, एपीआय, विक्रमगड

Web Title: Vikramgarh is facing panic attack, police is facing failure, patrol demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.