भरावामुळे वसई बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:09 PM2018-07-21T23:09:55+5:302018-07-21T23:10:22+5:30

जलप्रलय नैसर्गिक नव्हता; अवैध बांधकामे, भूमाफिया हेच कारणीभूत

Vasai drowned due to the payment | भरावामुळे वसई बुडाली

भरावामुळे वसई बुडाली

Next

पारोळ : वसईतील शेकडो कोटींची मालमत्ता व चौघे बळी जाण्यास कारणीभूत ठरलेला जलप्रलय हा निसर्ग निर्मित नव्हता तर बेकायदेशीर माती भराव आणि पाणथळ जागांवरील अतिक्र मणे, भू माफिया यामुळेच वसई बुडल्याचा आरोप शिवसेनेचे पालघर उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला असून, बेकायदेशीर माती भराव करणाऱ्या भूमाफीयांबाबत वेळोवेळी पूर्वकल्पना देऊनही उपाय योजना न करणाºया प्रशासकीय अधिकाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन वसई-विरार नालासोपारा पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक नागरिकांचे संसारच उघड्यावर पडले. अजूनही वसईतील नागरिकांना या घटनेपासून सावरता आलेले नाही.त्याचे तीव्र पडसाद येथे उमटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या सविस्तर निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, वसई पूर्वेच्या राजावली ग्रामंपचायतीच्या हद्दीत सर्व्हे नंबर १ ते १००, २७२, २७४, २८०, २८१, २६६ व ३३१ मध्ये झालेल्या बेकायदेशीर माती भरावामुळेच बºयाच ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन मोठा परिसर पाण्याखाली गेला.येथील खार जमिनीत (राजाळखार) सहारा ग्रुपने मोठ्या प्रमाणात माती भरावाचे काम केलेले असून हा भराव जवळजवळ शेतजमिनीपासून आठ ते दहा फूट उंच आहे. येथूनच सोपारा-वालीव, सातिवली मार्गे पाणी येते ते नायगाव खाडीला, अर्थात समुद्राला मिळते. पावसाळ्यात तुंगारेश्वर डोंगराचे पाणी, नालासोपारा-विरार शहरातील पाणी, गोखिवरे भागातील पाणी या सर्व ठिकाणच्या पावसाळी पाण्याचा निचरा याच सोपारा-वसई खाडीमार्गे होत असतो. पेल्हार धरण जेव्हा ओव्हर फ्लो होते त्याचे पाणी येथूनच येते. ज्या ठिकाणी भराव झालेला आहे, पूर्वी पूरपरिस्थितीतही त्या ठिकाणाहून जवळजवळ तीन मैल अंतरापर्यंत पाणी त्या शेतजमिनीवरून पसरून वाहत असे! आता फक्त सोपारा-वसई-नायगाव खाडीतूनच पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे नवघर पूर्व भागातील कारखाने आदी भाग पाण्याखाली गेला. कारण विस्तृत पाणी वहायचे बंद झाले. आधी ज्या पाण्याचा निचरा एक दिवसात व्हायचा, त्याला आता पाच दिवस लागले.
त्यांनी दिलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आम्ही दि. ६/६/२०१५ व दि. ७/७/२०१५ रोजी याबाबतीत जिल्हाधिकारी जिल्हा ठाणे व स्थानिक प्राधिकरणाला निवेदने देऊन तक्रार केली असता तहसीलदार, वसई तालुका यांनी संंबंधित ‘सहारा’ बिल्डरला बेकायदेशीर माती भराव केल्याप्रकरणी ४ कोटींची दंडात्मक नोटीस बजावली व ते काम बंद केले. पण सिडकोची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे केलेला भराव तसाच आहे. जर आम्ही आधीच दिलेल्या निवेदनानुसार शासनाने तो भराव काढून टाकला असता तर आज जी वसई पाण्यात बुडाली ती बुडाली नसती दृश्य दिसले नसते तो भराव बेकायदेशीर आहे.

दोषी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच या भागातून पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करावेत, याची चौकशी करु न दोषींविरोधात गुन्हे दाखल करावेत. नागरिकांची भविष्यात होणाºया माती भरावाच्या धोक्यापासून मुक्तता करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. ​​​​​​​

‘वसई का बुडाली’; आज होणार परिसंवाद ...
वसई प्रतिनिधी : अतिवृष्टीच्या काळात वसई विरार शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते, या तालुक्याची वाताहात का झाली,याची नेमकी कोणती कारणे आहेत ती शोधायला हवीत. या पार्श्वभूमीवर ‘वसई का बुडाली’ या विषयांवर पर्यावरण संवर्धन समितीतर्फे रविवारी दि. २२ जुलै सायंकाळी ५ वाजता माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळ सभागृहात परिसंवाद होणार आहे.

या परिसंवादात जेष्ठ साहित्यिक व हरित वसईसाठी लढा देणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो ,नगररचनाकार आणि माजी मंत्री चंद्रशेखर प्रभू मार्गदर्शन करतील. तसेच या परिसंवादासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांचीही उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी दिली.

Web Title: Vasai drowned due to the payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.