महाराष्ट्रातील युनेस्को स्कूल क्लब चळवळ अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 03:11 AM2019-03-20T03:11:52+5:302019-03-20T03:12:10+5:30

देशात यूनेस्को स्कूल क्लबची स्थापना करणारी पहिल्या जिल्हा परिषद शाळेचा मान डहाणूतील गोवणे शाळेला मिळाला आहे.

The UNESCO School Club Movement in Maharashtra tops the list | महाराष्ट्रातील युनेस्को स्कूल क्लब चळवळ अव्वल

महाराष्ट्रातील युनेस्को स्कूल क्लब चळवळ अव्वल

Next

- अनिरु द्ध पाटील

बोर्डी  - देशात यूनेस्को स्कूल क्लबची स्थापना करणारी पहिल्या जिल्हा परिषद शाळेचा मान डहाणूतील गोवणे शाळेला मिळाला आहे. या शाळेचे उपक्र मशील शिक्षक विजय पावबाके यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ३५० हून अधिक यूनेस्को स्कूल क्लब स्थापन झाल्याने जपानसह चीन, व्हीएतनाम आदी राष्ट्र पिछाडीवर पडले आहेत.

१९४७ साली जपानमध्ये यूनेस्कोची पहिली असोसिएशन स्थापन झाली. आजतागायत आंतरराष्ट्रीयस्तरावर शंभरहुन अधिक देशात चार हजारहुन अधिक यूनेस्को क्लब व असोसिएशन्स निर्माण झाल्या आहेत. या स्कूल क्लब अंतर्गत विविध स्पर्धा कल्चरल एक्सचेंज व स्टडी टूर या उपक्र मांचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय व्यासपीठ उपलब्ध होते. एका राष्टÑीय परिषदेत यूनेस्कोचे आंतरराष्टÑीय अध्यक्ष डॉ. धीरेन्द्र भटनागर यांच्यकडून ही माहिती शिक्षक विजय पावबाके यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सर्व नियमावली जाणून घेवून पहिल्यांदा गोवणे शाळेत यूनेस्को क्लब स्थापित केला. त्यामुळे हा क्लब स्थापन करणारी गोवणे ही देशातील पहिली जि. प. शाळा ठरली.

यूनेस्कोच्या माहिती पत्रकात दिल्ली व उत्तर भारताती अनेक खाजगी व उच्चभ्रू शाळा या योजनेचा लाभ घेत असल्याची नोंद आहे. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शाळा या पासून वंचित होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेशी जोडता यावे म्हणून राज्य पातळीवर यूनेस्को स्कूल चळवळ सुरु करण्याचा विचार पावबाके याांनी केला.

त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा व्हाट्सअ‍ॅप्प ग्रुप तयार करण्यात आला. त्याची लिंक राज्यभरातील शैक्षणिक ग्रुपवर पोस्ट करून उपक्र मशील शाळांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहान करण्यात आले.

या ग्रुप मार्फत त्यांना यूनेस्को स्कूल क्लबची माहिती दिली. त्यानंतर राज्यभरातून एकूण दोनहजारा पेक्षा अधिक शाळा या ग्रुपशी जोडल्या गेल्या. त्यानंतर डॉ. भटनागर यांच्याकडून मेंबरशिप फॉर्म मागवून सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात आले. तसेच, सर्व शाळांची मोफत नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून सुमारे पावणे चारशे प्रस्ताव जमा झाले. ते सर्व मेल करण्यात आले. या सर्व शाळांना यूनेस्को स्कूल क्लब स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली.

जबाबदार भावी ग्लोबल सिटीजन निर्माण होणे हे यूनेस्को स्कूल क्लबचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्यात यूनेस्को स्कूल क्लबच्या निमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
- विजय पावबाके, राज्य समन्वयक, यूनेस्को स्कूल चळवळ

महाराष्ट्रातील यूनेस्को क्लब चळवळसाठी विजय पावबाके यांनी राज्य समन्वयक म्हणून काम केले. वर्ष २०१९ मध्ये यूनेस्को क्लब चळवळ त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात सुरु झाली.
- डॉ. धीरेन्द्र भटनागर, अध्यक्ष,
वर्ल्ड फेडरेशन आॅफ यूनेस्को क्लब

Web Title: The UNESCO School Club Movement in Maharashtra tops the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.