बोगस कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत हॉटेल, तीन जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 05:13 AM2019-07-20T05:13:12+5:302019-07-20T05:13:19+5:30

बनावट कागदपत्राच्या आधारे अलिशान हॉटेल बांधून शासनाची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध कासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Unauthorized hotel based on bogus documents; | बोगस कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत हॉटेल, तीन जणांवर गुन्हा दाखल

बोगस कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत हॉटेल, तीन जणांवर गुन्हा दाखल

Next

कासा : आदिवासी मालकी जागेवर तहसील कार्यालयाचा बोगस बिनशेती दाखला तयार करून बनावट कागदपत्राच्या आधारे अलिशान हॉटेल बांधून शासनाची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध कासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कासा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोघेजण फरार आहेत.
डहाणू तालुक्यातील मुंबई - अहमदाबाद महामार्गावर धानीवरी येथे आदिवासी व वनविभागाच्या जागेत रोजगार्डन हे आलिशान हॉटेल बांधले आहे. या बांधकामाबाबत स्थानिक ग्रामपंचायीत ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केला असता स्थानिकांच्या विरोधामुळे ग्रामपंचायतीने हा दाखला देण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतरही हॉटेलचे बांधकाम केल्याने येथील रहिवाशांनी डहाणू तहसीलदारकडे तक्रार केली. ती मिळाल्यावर डहाणू तहसीलदारांच्या आदेशाने प्रत्यक्ष पाहणी करून कागदपत्रे तपासली. तेव्हा हॉटेल मालकाने इतर दस्तावेजासह डहाणू तहसील कार्यालयाच्या परवानगी दाखल्याच्या झेरॉक्स प्रती, कागदपत्रे सादर केली. तेव्हा, तहसील कार्यालयाचा बिनशेतीचा दाखला बोगस असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे बनावट दस्तावेज बनवल्याप्रकरणी कासा मंडळ अधिकारी प्रल्हाद खेडकर यांनी कासा पोलीस ठाण्यात हॉटेल मालक हबीबउल पटेल (रा.जोगेश्वरी, मुंबई), जमीन व्यवहार करणारे भालचंद्र वझे (रा.दापचरी) आणि विनोद मानकर (रा.डहाण)ू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यावर भालचंद्र वझे यांना पालघर मार्केट येथून अटक केली. दोन आरोपी फरार असून हबीबउल पटेल यांनी पालघर कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज फेटाळला आहे.


या संदर्भात तक्रार आल्यानंतर धानिवरी येथील हॉटेलच्या जमिनीची कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे निदर्शनास आले. यानंतर संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू.
आरोपींनी बनविलेल्या जागेच्या बनावट कागदपत्रांची मूळ प्रत मिळविली असून, एका आरोपीला पकडले आहे, तर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
- आनंदराव काळे, सहायक पोलीस निरीक्षक, कासा.

Web Title: Unauthorized hotel based on bogus documents;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.