उद्धव ठाकरे आज वसईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:33 AM2019-04-27T00:33:36+5:302019-04-27T00:34:21+5:30

पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी वसई मध्ये येणार असून ते शेवटच्या दिवशी मतदारांना काय आश्वासन देणार याकडे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

Uddhav Thackeray is today Vasayat | उद्धव ठाकरे आज वसईत

उद्धव ठाकरे आज वसईत

Next

नालासोपारा : पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी वसई मध्ये येणार असून ते शेवटच्या दिवशी मतदारांना काय आश्वासन देणार याकडे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
उध्दव ठाकरे हे शनिवारी सकाळी ९ वाजता वसईमध्ये प्रचारासाठी येणार असून शेवटचा दिवस असल्यामुळे माठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमणार असल्याचे कळते. उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे पंचवटी नाका, वसईचे शिवसेना शहर कार्यालय, भुईगाव नाका, निर्मळ येथील भाजपा कार्यालय, वाघोली नाका, उंबरगोठण नाका, आगाशी आणि चाळपेठ येथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत चौकसभा घेणार आहेत.

वंडा येथे चौकसभा
शुक्र वारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वंडा येथील बौद्धस्तुपाच्या बाजूलाच असलेल्या जागेजवळ चौकसभा होणार असल्याचे सूत्रांकडून कळते. याठिकाणी मोठ्या संख्येने शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमणार आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे २९ गावांच्या प्रश्नावर काही गावकऱ्यांना भेटणार असल्याने त्याचे महत्व वाढले आहे.

Web Title: Uddhav Thackeray is today Vasayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.