ट्रकच्या धडकेत दोन ठार, आठ जखमी ; ट्रक चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 02:46 AM2018-04-15T02:46:40+5:302018-04-15T02:46:40+5:30

महालक्ष्मी यात्रेतून कासा येथे परतणाऱ्या रिक्षाला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी एशियन पेट्रोल पंप येथे मागून येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ८च्या सुमारास घडला.

 Two killed, eight injured in truck crash Truck driver arrested | ट्रकच्या धडकेत दोन ठार, आठ जखमी ; ट्रक चालकाला अटक

ट्रकच्या धडकेत दोन ठार, आठ जखमी ; ट्रक चालकाला अटक

Next

कासा (ता. डहाणू) : महालक्ष्मी यात्रेतून कासा येथे परतणाऱ्या रिक्षाला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी एशियन पेट्रोल पंप येथे मागून येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ८च्या सुमारास घडला.
प्राची सुनील अंधेर (१०) रा. पिंपळशेत आणि रिक्षाचालक लाडक्या नित्या बाबर (३०) रा. कासा, अशी मृतांची नावे आहेत. प्राचीचा जागीच मृत्यू झाला, तर बाबर याचा उपचारादरम्यान बालसाड येथे मृत्यू झाला.
या अपघातात सुप्रिया सुनील अंधेर (२०) रा. वांगर्जे, दर्शना राजेश डगला (३५) रा. वेती, सुनील अंधेर (४०) रा. वांगर्जे, तेजिस्वनी सुनील अंधेर (१२) रा. वांगर्जे, साहिल सुनील अंधेर (६) रा. वांगर्जे, राजेश ढवळे (३५) रा. सूर्यानगर, सुनीता राजेश डगला (३५) रा. वेती, दर्शना सुनील अंधेर (३५) रा. वांगर्जे असे
आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कासा येथील उपजिल्हा रु ग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वलसाड येथे पाठविण्यात आले.
या प्रकरणी कासा पोलिसांनी ट्रकचालक सत्येंद्र मंगला यादव याला अटक केली आहे.

Web Title:  Two killed, eight injured in truck crash Truck driver arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात