Two car bombs killed, two injured in car accident | कार अपघातात एकाच कुटुंबातील दोघे ठार, दोन जखमी

 डहाणू  -  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे जाणाºया दोन भरधाव कारच्या समोर अचानक बैल आडवा आल्याने ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नी ठार झाले तर दुस-या कारमधील दोघे जखमी झाली. ही दुर्घटना आंबोली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
पिंकी शहा (३८) आणि चिराग शहा (४०, रा. बडोदा) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. शहा दाम्पत्य सोमवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जात होते. याचवेळी आणखी एक कारदेखील या मार्गावरून जात होती. दरम्यान, बैल आडवा आल्याने भरधाव येणाºया दोन्ही कारचा ताबा सुटून त्या दुभाजकावर आदळल्या. यात शहा दाम्पत्य ठार झाले तर दुसºया कारमधील दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना तलासरी रु ग्णालयातून वापी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.