Transport of the buses buses; Disruptive action on the driver | पालिकेची परिवहन बस भरकटली; चालकावर बडतर्फीची कारवाई
पालिकेची परिवहन बस भरकटली; चालकावर बडतर्फीची कारवाई

वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बस शनिवारी सकाळी भरकटून एका घराच्या कंपाऊंड वॉलला जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कोणालाही गंभीर इजा झाली नस्ली तरी सदर बस चालक दारू पिऊन बस चालवित असल्याचे लक्षात येताच, प्रवासी व गावकऱ्यांनी त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले.
शनिवारी सकाळी वसई -विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या नालासोपारा-नाळा या मार्गावर सकाळी ९:३० वाजता बस प्रवास सुरू असताना अचानक ती दिशाहीन होऊन नानभाट गावात शिरून एका घराच्या वॉलकंपाउंडला धडकली. चालक भागवत हरी हाके याने इतकी दारू प्यायली होती की, त्याला शुद्ध नव्हती. बस थांबल्यानंतर बसमधील प्रवासी घाबरून बस मधून उतरले. मात्र चालक भागवत नशेत धुत होता. याबाबत नालासोपारा पोलिसांना कळविल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले व बस पोलिस ठाण्यात नेली. परिवहन सभापती प्रितेश पाटील यांनी पोलिस ठाण्यात जाऊन चालकाला पुढील चौकशी होईपर्यंत बडतर्फीची नोटीस हाती दिली. इतर दोन जणांवरही निलंबनाची कारवाई होणार आहे.
सुदैवाने या परिसरात शाळेला सुट्टी असल्यामूळे कोणताही दुदैवी प्रकार घडला नाही. मात्र या घटनेची गंभीर दखल परिवहनने घेतली असून सदर चालकाला निलंबित करण्यात आले आहे. पालिकेची परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालविली जात असून या ठेकेदाराने नेमणूक केलेल्या अनेक चालकांबद्दल तक्र ारी आहेत. गेल्या महिन्यात भूईगाव येथील एका महिलेचा परिवहनच्या बसखाली सापडून मृत्यू झाला होता. याबाबत पर्यावरण संवर्धन समितीतर्फे पालिका मुख्यालयासमोर श्रद्धांजली कार्यक्र मही घेतला गेला होता.
याप्रकरणी स्टॅण्ड इन्चार्ज व कंडक्टर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगीतले, महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. तर परिवहनचे ठेकेदार मनोहर सकपाळ अजुन कोकणात होळीसणानिमीत्त सट्टीवर गेल्याचे सांगण्यात आले.

सदर चालकावर कामावर असताना मद्यप्राशन करून बस चालविल्याप्रकरणी २४ मार्चपासून पुढील चौकशी होईपर्यंत बडतर्फीची नोटीस बजावली आहे.
- तुकाराम शिव भक्त, आगार प्रमूख


Web Title: Transport of the buses buses; Disruptive action on the driver
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

ताजा खबरें

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

6 minutes ago

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

8 minutes ago

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

13 minutes ago

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

15 minutes ago

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

15 minutes ago

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

16 minutes ago

वसई विरार अधिक बातम्या

कोणतीही बाजू ऐकून न घेता आदिवासींच्या घरावर हातोडा

कोणतीही बाजू ऐकून न घेता आदिवासींच्या घरावर हातोडा

16 hours ago

बोर्र्डीचा खुटखाडी पूल वाहतुकीला खुला

बोर्र्डीचा खुटखाडी पूल वाहतुकीला खुला

16 hours ago

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

16 hours ago

पर्यटनस्थळ म्हणून निवड होऊनही पाणजूची शोकांतिकाच

पर्यटनस्थळ म्हणून निवड होऊनही पाणजूची शोकांतिकाच

1 day ago

दगडगोट्यांच्या उत्खननामुळे किनारपट्टी संकटात

दगडगोट्यांच्या उत्खननामुळे किनारपट्टी संकटात

1 day ago

मासेमारीबंदीच्या फतव्याने तीव्र नाराजी

मासेमारीबंदीच्या फतव्याने तीव्र नाराजी

1 day ago