डहाणू/बोर्डी : दारु पिऊन ४० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणारे अस्वाली आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यशवंत लक्ष्मण वाघ यांची दाभाडी शाळेवर बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी दुर्लक्षिण्यात आली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. विद्यार्थ्यांनी संघटीत होऊन एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. लोकमतने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाची माहिती खेडोपाडयापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे मुख्यध्यापक वाघ यांची अंतिम चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना रजेवर पाठवा अथवा जिल्ह्याबाहेरील शाळेवर नियुक्त करण्याची मागणी विद्यार्थी पालक तसेच नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)