टूर डी वसईला भरघोस प्रतिसाद

By admin | Published: July 17, 2017 01:01 AM2017-07-17T01:01:58+5:302017-07-17T01:01:58+5:30

पर्यावरण जनजागृती, प्रदुषण विरहीत वातावरण, पर्यटन प्रसार या सामाजिक बांधिलकीने प्रेरीत होऊन सुरु झालेल्या टूर डी वसई सायकल

Tour de Vasai's overwhelming response | टूर डी वसईला भरघोस प्रतिसाद

टूर डी वसईला भरघोस प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : पर्यावरण जनजागृती, प्रदुषण विरहीत वातावरण, पर्यटन प्रसार या सामाजिक बांधिलकीने प्रेरीत होऊन सुरु झालेल्या टूर डी वसई सायकल रॅलीला रविवारी चौथ्या वर्षी भरघोस प्रतिसाद मिळाला. तब्बल साडेचारशे सायकलस्वारांनी ५० किलोमीटरची सायकलिंग रॅली पूर्ण केली.
सकाळी साडेसहाला सायकलपटूंना झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. डीवायएसपी जयंत बजबळे, प्रथम महापौर राजीव पाटील, नगरसेविका प्रज्ञा देसाई, प्रफुल्ल साने, आयर्न मॅन हार्दीक पाटील, सायकलिंग संघटनेच्या अध्यक्षा साधना पाटील यावेळी हजर होते. बजबळे आणि राजीव पाटील यांनी ५० किलोमीटरची रॅली पूर्ण केली. वसई किल्ल्यात इतिहास तज्ञ श्रीदत्त राऊत यांनी वसई किल्ल्याची माहिती दिली. अमेय क्लासिक क्लब आणि सायकल व्हिलेजने आयोजित केलेल्या रॅलीला पर्यटन विकास महामंडळाने सहकार्य केले. ही रॅली यशस्वी करण्यासाठी सिराज लोपीस, योगेश चौधरी, लॉसन कोरीया, संतोष पिंगुळकर, प्रवीण झोरे यांनी मेहनत घेतली.

Web Title: Tour de Vasai's overwhelming response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.