नालाासोपाऱ्यात तीन लुटारुंची टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:50 PM2019-06-17T22:50:47+5:302019-06-17T22:50:52+5:30

बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्यांना करायचे टार्गेट; १२ गुन्हे उघड, लाखोचा मुद्देमाल जप्त

Three gangrapers detained in Navalas | नालाासोपाऱ्यात तीन लुटारुंची टोळी अटकेत

नालाासोपाऱ्यात तीन लुटारुंची टोळी अटकेत

Next

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील वालीव, माणिकपूर, नालासोपारा, विरार या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गाडीची काच फोडून, मोटार सायकलच्या डिक्कीमधून, बँकेच्या बाहेरून तसेच कारचे आॅईल लिकेज झाल्याचे सांगून अनेकांचे पैसे चोरणाºया तीन जणांच्या टोळीस गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांचा एक साथीदार फरार आहे त्याचा शोध घेत आहे. या टोळीकडून पोलिसांनी १२ गुन्हे उघड केले असून लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड जप्त केली आहे.

वसई पूर्वेकडील एव्हरशाईन येथील बँकेच्या बाहेर दोनजण संशयितपणे उभे असल्याचे सागर यादव आणि सचिन दोरकर या पोलिसांना दिसले. त्यांच्याजवळ जाऊन विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना संशय आला. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यावर गाडीची काच फोडून, मोटार सायकलच्या डिक्कीमधून, बँकेच्या बाहेरून तसेच कारचे आॅईल लिकेज असे सांगून अनेक लोकांचे पैसे चोरल्याची कबुली दिली. रतन नारायण गुंजाळ (४६), सुनील नारायण गुंजाळ (३५) आणि कोटेश शामल गायकवाड (४६) या तिघांपैकी दोघांना पकडले असून यांचा एक साथीदार अद्यापपर्यंत फरार आहे. त्यांनी एकूण १२ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी या टोळीकडून चोरी करण्यासाठी लागणारे हत्यारे, मोटार सायकल, सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही टोळी दक्षिणेतील असून महाराष्ट्रात अशा अनेक टोळ्या धूमाकूळ आहे. या टोळीने ठाणे, नवी मुंबई, पालघर, गुजरात याठिकाणी अनेक चोºया केलेल्या असून अनेक वेळा जेलमध्ये गेलेले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले आहे. कोटेश गायकवाड या टोळीचा मोरक्या असून त्याच्यावर ६ ते ७ गुन्हे दाखल असून जेलमध्येही शिक्षा भोगलेली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस हवालदार मनोज मोरे, सागर यादव, सचिन दोरकर, राजेंद्र फड, महेश जाधव, तुकाराम माने, संतोष शेंडे, बालाजी गायकवाड, सचिन बळीद आणि भीमगौंडा व्हसकोटी या टीमने ही टोळी जेरबंद केली आहे.

बायकोचा वाढदिवस होता
भिनारचे माजी उपसरपंच रुपेश वसंत पाटील यांनी पत्नीचा वाढदिवस १७ एप्रिला असल्याने ज्वेलर्समधून १ लाख २१ हजार रुपयांचा ३ तोळे २ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, ४३ हजार रु पये किंमतीचे कानातील दीड तोळे वजनाचे झुमके, ८ हजार रुपयांची अर्धा तोळे वजनाची सोन्याची रिंग आणि ४ हजार ५०० रु पये किंमतीचे पैंजण असे एकूण १ लाख ७६ हजार ५०० रु पयांचे सोन्याचांदीचे दागिने विकत घेतले व नंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कार पार्क करून समोरच असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले व दागिन्यांची बॅग गाडीतच ठेवली. याच टोळीने गाडीच्या खिडकीची मधली काच फोडून गाडीतील दागिने चोरी केले होते.

Web Title: Three gangrapers detained in Navalas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.