Thirty years of education in rape - murder case | बलात्कार - हत्या प्रकरणी तीस वर्षांची शिक्षा

विरार(पालघर) : शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणा-या राहुल तुंबडा (२४) याला वसई सत्र न्यायालयाने ३० वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१४मध्ये वसईतील पूर्वपट्टीतील कामण गावात ही मुलगी शाळेतून परत येत असताना आरोपीनी तिला दुचाकीवरून घरी सोडतो असे सांगितले आणि शारजामोरेच्या जंगलात तिच्यावर बलात्कार करून हत्या केली.
त्यानंतर राहुलविरोधात वालीव पोलीस ठाण्यात कलम ३७६ पॉक्सो व कलम ३०२ अन्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
या गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले.


Web Title: Thirty years of education in rape - murder case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.