दुर्गम शाळांत शिक्षिकांची नियुक्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:01 AM2018-02-23T02:01:02+5:302018-02-23T02:01:08+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षिकांना यापुढे दुर्गम व अतिदुर्गम भागात नियुक्ती न करण्याचा वजा सध्या कार्यरत आहेत. त्यांना अन्यत्र बदली करण्याचा महत्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

There is no recruitment of teachers in inaccessible schools | दुर्गम शाळांत शिक्षिकांची नियुक्ती नाही

दुर्गम शाळांत शिक्षिकांची नियुक्ती नाही

Next

पालघर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षिकांना यापुढे दुर्गम व अतिदुर्गम भागात नियुक्ती न करण्याचा वजा सध्या कार्यरत आहेत. त्यांना अन्यत्र बदली करण्याचा महत्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांत समाधानाचे वातावरण आहे.
दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये जाऊन अध्यापन करणे खूपच जिकरीची बाब असून महिलांना त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. पालघर जिल्ह्याच्या बहुतेक सर्वच तालुक्यातील काही भागात जाऊन काम करणे विशेषत: शिक्षिकांसाठी खूपच अवघड असून केवळ नोकरी सांभाळण्यासाठी काहीजणी मानसिक दडपणात हे दिव्य पार पाडत होत्या. प्रतिकूल परिस्थिती असलेल्या शाळांच्या ठिकाणी प्रवास करणे असह्य असल्याचे लक्षात आल्याने शिक्षिकांना अशा शाळा नियुकी न देण्याची बाब विचाराधीन होती.
१५ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयाद्वारे जिल्हा परिषदेअंतर्गत येणाºया तसेच अवघड क्षेत्र म्हणून घोषीत असलेल्या ज्या शाळा दुर्गम व अतिदुर्गम भागात आहेत. तेथे स्थानिक परिस्थितीमुळे शिक्षिकांना काम करण्यास प्रतिकूल म्हणून घोषीत करण्याची कार्यवाही जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी असे स्पष्ट केले आहे. शिवाय अशा ठिकाणी प्रशासकीय बदलीने अथवा नियुक्तीने त्यांना पदस्थापना न देण्याचे नमूद केले आहे. सध्या अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षिकांनी मे २०१८ च्या बदली प्रक्रि येत अर्ज करावेत, त्यांना बदलीचा अधिकार प्राप्त होईल असे म्हटले आहे. दरम्यान या निर्णयाचे महिला शिक्षिकांनी स्वागत केले असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: There is no recruitment of teachers in inaccessible schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.