भार्इंदर रविवारच्या बाजारावर कारवाई नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 06:20 PM2017-12-10T18:20:24+5:302017-12-10T18:25:48+5:30

भार्इंदर पश्चिमेच्या बेकायदा विस्तारीत रविवार बाजारास महापालिका व सत्ताधारी पाठीशी घालत असल्याने कारवाईच केली जात नाही.

There is no action on Sunday in Bhinder Singh | भार्इंदर रविवारच्या बाजारावर कारवाई नाहीच

भार्इंदर रविवारच्या बाजारावर कारवाई नाहीच

Next

 मीरारोड - भार्इंदर पश्चिमेच्या बेकायदा विस्तारीत रविवार बाजारास महापालिका व सत्ताधारी पाठीशी घालत असल्याने कारवाईच केली जात नाही. पालिकेचे अधिकारीच न फिरकल्याने बाऊंसर असुन ही फेरीवाल्यांवर कारवाई झाली नाही. बेकेयदा बाजारा मुळे वाहतुकीची नेहमीच मोठी कोंडी होऊन चोरटे व उनाडटप्पुंचा सुळसुळाट झाला असताना सत्ताधारी - पालिकेला मात्र फेरीवाले व बाजार वसुली ठेके दाराचे हित जोपासण्यात स्वारस्य असल्याचे स्पष्ट झालंय. दुसरी कडे भार्इंदर पोलीस ठाणे व वाहतुक शाखा सुध्दा या गंभीर समस्ये कडे पाहण्यास तयार नाही.

भार्इंदर पश्चिमेस पोलीस ठाण्या पासुन देना बँके पर्यंत पुर्वीचा रवीवार आठवडा बाजार भरत असे. पण आता सदरचा बाजार अवास्तव फोफावला असुन थेट शिवसेना गल्ली पर्यंत भरु लागला आहे. भार्इंदर रेल्वे स्थानका का कडे जाणारा तसेच तेथुन अगदी मुर्धा पासुन थेट उत्तन, चौक व गोराई पर्यंतचा हाच एकमेव रस्ता आहे. हा मुख्य रस्ता असल्याने बेस्ट, एसटी, एमबीएमटी सह रिक्षा, दुचाकी , चारचाकी वाहनांची नेहमीच मोठी वाहतुक या मार्गावर असते.

शहराचा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची सतत वर्दळ असताना या मार्गावर सर्रास बेकायदा वाहनं पार्क केली जातात. फेरीवाले व हातगाड्या देखील बेधडक लावल्या जातात. या मुळे नेहमीच या भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना रवीवारच्या या बेकायदा फेरीवाल्यां मुळे तर प्रवाशांच्या हालात प्रचंड भर पडते. वाहतुक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

रवीवार बाजार म्हणजे भुरटे चोर, पाकिटमार यांचा सुळसुळाट झाला असुन उनाडटप्पु देखील महिला - मुलींची छेड काढत फिरत असतात. गुन्हेगारी कारवाया वाढत असतानाच दुसरी कडे बाजारात बसणारया फेरीवाल्यां कडुन प्लॅस्टीक, भाज्या आदी अन्य कचरा येथेच टाकला जातो. त्यामुळे साफसफाईसाठी पालिकेलाच भुर्दंड सोसावा लागतो.

शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सद्या रस्त्याचे काम सुरु असल्याने या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा आणखीनच ताण पडतोय.

वास्तविक सत्ताधारी भाजपाने त्यावेळी शिवसेना, बविआ सोबत मिळुन डिसेंबर २०१५ रोजीच्या महासभेत बेकायदा विस्तारीत रवीवार बाजार बंद करण्याचा ठराव केला होता. देना बँक पर्यंतच बाजार बसु द्यावा. स्थानिक सुकी मासळी विक्रेते, स्थानिक भाजीपाला व दैनंदिन वापरातले घरगुती खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाच बाजारात बसु देण्याचे ठरावात नमुद केले होते. सुरवातीला कारवाईचे नाटक पण नंतर मात्र क्रॉस गार्डन पर्यंत व पुढे थेट शिवसेना गल्ली पर्यंत सर्रास बेकायदा फेरीवाले बसु लागल्याने वाहतुक कोंडी होऊन प्रवाशी व पादचारी नागरीकांना जाच होतोय.

दोन वर्ष होऊन देखील ठरावा वर पालिका अधिकारी नियमीत कारवाई करत नसतानाच नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या फेरीवाले हटवण्याच्या आदेशाला देखील पालिकेने केराची टोपली दाखवली आहे.

जेवढे फेरीवाले वाढणार तेवढी जास्त बाजार शुल्क वसुली पालिकेने नेमलेल्या बाजार वसुली ठेकेदाराची होते. सदर ठेकेदारास सत्ताधारी व स्थानिक नेतृत्वाचा वरदहस्त असल्याने ठेकेदाराचा फायदा बुडु नये म्हणुन देखील पालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपा या बेकायदा बाजारा विरोधात मुग गिळुन गप्प असल्याचे आरोप केले जातात.

त्यातच प्रभाग अधिकारी व पालिका कर्मचारी आज सकाळी रवीवार बाजारात कारवाईची कल्पना असुन देखील कुठे दिसले नाहित. दुसरी कडे पालिकेचे ठेक्याने घेतलेले बाऊंसर व पालिकेचा टॅम्पो मात्र फेरया मारत होता. पण कारवाई मात्र केली जात नव्हती. पालिका अधिकारयांचे खिसे भरले असुन त्या मुळे ते कारवाई करणार नसल्याचे आरोप काहींनी केले. तर या प्रकरणी विभागप्रमुख संजय दोंदे व प्रभाग अधिकारी जगदिश भोपतराव यांच्याशी संपर्क साधला असता गुळमुळीत उत्तरं देउन फेरीवाल्यांवर कारवाई मात्र केलीच गेली नाही.

Web Title: There is no action on Sunday in Bhinder Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.