एटीएम वापरून फसवणूक करणाऱ्या चोरट्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:03 AM2019-07-16T01:03:12+5:302019-07-16T01:03:19+5:30

आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये हात चलाखीने एका तरुणाचे एटीएम घेऊन त्याच्या खात्यामधून १० लाख ७३ हजार रुपये काढणा-याला पोलिसांनी अटक केली आहे.

Theft of cheating agents using ATMs | एटीएम वापरून फसवणूक करणाऱ्या चोरट्याला अटक

एटीएम वापरून फसवणूक करणाऱ्या चोरट्याला अटक

Next

नालासोपारा : नायगाव पूर्वेकडील परेरा नगरमधील आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये हात चलाखीने एका तरुणाचे एटीएम घेऊन त्याच्या खात्यामधून १० लाख ७३ हजार रुपये काढणा-याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी दोन पथके नेमण्यात आली होती. विविध बँकेची ४७ एटीएम कार्डे त्याच्याकडून जप्त केली असून ७ लाख ९० हजार रुपयांचा सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहित पांडे (२८) असे त्याचे नाव आहे.
विरारच्या चांदीप गावात राहणारा प्रणित किरण पाटील (२२) हा मावस भाऊ हितेश रामनाथ राव याचे बॅसिन कॅथलिक बँकेचे एटीएम कार्ड घेऊन नायगाव पूर्वेकडील परेरा नगरमधील आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये गेला असता त्याला पैसे काढता आले नाही. त्याचवेळी तिथे असलेल्या एका इसमाने प्रणितला पैसे काढून दिले पण हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून १४ जून २०१९ ते ४ जुलै २०१९ च्या दरम्यान १० लाख ७३ हजार १०३ रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली होती. हे लक्षात आल्यावर तक्रार दाखल झाली होती.

Web Title: Theft of cheating agents using ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.