वायुप्रदूषण तपासणारे तारापूरचे स्टेशन सव्वा वर्षापासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 03:50 AM2018-09-20T03:50:59+5:302018-09-20T03:51:41+5:30

लाखो खर्चून केली होती उभारणी; प्र.नि.मंडळ म्हणते पुन्हा चालू करू

The tariff for the air pollution test and the closure of the station for the year | वायुप्रदूषण तपासणारे तारापूरचे स्टेशन सव्वा वर्षापासून बंद

वायुप्रदूषण तपासणारे तारापूरचे स्टेशन सव्वा वर्षापासून बंद

- पंकज राऊत

बोईसर : तारापूरला वायू प्रदूषणाची प्रचंड समस्या असतांनाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारतीवरील हवेची गुणवत्ता तपासणारे व २०१२ साली लाखो रुपये खर्चून कार्यान्वित केलेले स्टेशन सव्वा वर्षा पासून अक्षरश: धूळ खात पडले आहे ते पूर्ववत सुरू करण्या संदर्भात काहीही हालचाल सव्वा वर्षा पासून दिसत नसल्याने ते बंद ठेवण्या मागे कुणाचे हित जपले जाते आहे? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.
तारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे.एस.डब्ल्यू.स्टील लि. ( जिंदाल स्टील) या कारखान्याने सप्टेंबर २००९ साली ३० मेगावॅट क्षमतेचे कोळशावर चालणारे थर्मल पॉवर स्टेशन सुरू केल्या नंतर हवा व ध्वनी प्रदूषणाची मोठया प्रमाणात समस्या निर्माण होऊ लागल्याच्या तक्रारी म.प्र. नि. मंडळाकडे येताच प्रदूषण होऊ नये म्हणून काही उपाय योजना व सुधारणा सुचवून मंडळाने हवेची गुणवत्ता तपासणारी तीन स्टेशन्स एमआयडीसी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इन्स्टॉल करण्याचे निर्देश जे.एस.डब्ल्यू.स्टीलला दिले त्या पैकी हे एक स्टेशन होते.
सुमारे साठ लाखाचे एक अशी तीन युनिट कार्यान्वित केली गेली त्या पैकी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारती वर दिनांक २४ एप्रिल २०१२ रोजी हे पहिले स्टेशन सुरू केले गेले. या स्टेशन मधील अद्यावत तंत्राद्वारे पीएम २.५ (हवेतील तरंगणारे धूलीकण पीएम २.५ मायक्रोन ) पीएम १० (हवेतील तरंगणारे धुलीकण १० मायक्रोन ), सीओ (कार्बन मोनोआॅक्साईड), एस ओ २ (सल्फर डायआॅक्साईड), एन ओ २ (नायट्रोजन डाय आॅक्साईड) इत्यादींचे हवेतील प्रमाण मोजून हवेची गुणवत्ता तपासली जाऊन ती कार्यालया बाहेरील फलकावर लिहिण्यात येत होते. आता स्टेशन बंद झाल्याने तो फलक ही धूळ खात पडला आहे सुरुवातीची काही वर्ष सोडल्या नंतर त्या स्टेशन मध्ये संकलित होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या नोंदी (रिपोर्ट) धोक्याच्या पातळीच्या आत आहेत की त्यांनी पातळी ओलांडली आहे याची कोणतीही माहिती दिली जात नाही. म.प्र. नि. मंडळ हे एम. आय. डी. सी तिल उद्योगाची तपासणी करून दोषींवर कारवाईचा बडगा उचलते मग आपल्याच इमारती वर असलेले स्टेशन सव्वा वर्षा पासून बंद राहण्यास जबाबदार कोण याचा शोध ते कधी घेणार व दोषींवर कारवाई कधी करणार? असा प्रश्न आहे.

आता जबाबदारी येऊन पडली मंडळावर
सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता असा आहे की जे. एस. डब्ल्यू. स्टील लि. या कारखान्याने ३० मेगावॅट क्षमतेचे कोळशावर चालणारे सप्टेंबर २००९ साली सुरू केलेले थर्मल पॉवर स्टेशन बंद केले डिसेंबर २०१७ ला त्याचा संपूर्ण गाशा गुंडाळून तामिळनाडू मध्ये त्याचा प्लांट उभारला.
तारापूर येथील त्या थर्मल पॉवर स्टेशनची कन्सेंट ही महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळा कडे सरेंडर केल्याने आता हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन चालविण्याची जबाबदारी जे एस डब्ल्यूवर न राहिल्याने ते स्टेशन पुन्हा चालू करून कार्यान्वित करण्याची कायदेशीर जबाबदारी म.प्र. नि. मंडळावर आली आहे.

बंद असलेले स्टेशन जे. एस. डब्ल्यू . स्टील किंवा अन्य एखाद्या उद्योगाच्या साहाय्याने पुन्हा सुरू करण्यात येईल आणि या माध्यमातून ते सुरू करण्यास यश न आल्यास म.प्र. नि.मंडळ ते चालवेल
- एम .आर. लाड, प्रादेशिक अधिकारी, म.प्र. नि.मंडळ ठाणे

Web Title: The tariff for the air pollution test and the closure of the station for the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.