तारापूरच्या १६ कंपन्या बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजाविल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:14 AM2018-08-12T02:14:45+5:302018-08-12T02:14:59+5:30

तारापूर एम आय डी सी मधील १६ उद्योगांवर उत्पादन बंदची कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शुक्रवारी संध्याकाळपासून संबंधित उद्योगांना नोटीसा बजावण्याचे कामही सुरू झाले आहे.

Tarapur's 16 companies shut down, notices issued by pollution control board | तारापूरच्या १६ कंपन्या बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजाविल्या नोटिसा

तारापूरच्या १६ कंपन्या बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजाविल्या नोटिसा

Next

- पंकज राऊत
बोईसर : तारापूर एम आय डी सी मधील १६ उद्योगांवर उत्पादन बंदची कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शुक्रवारी संध्याकाळपासून संबंधित उद्योगांना नोटीसा बजावण्याचे कामही सुरू झाले आहे. अजूनही काही उद्योगांवर अशी कारवाई होण्याची शक्यता आहे तर मागील वर्षापासून अशा पद्धतीची अनेक वेळा कारवाई करूनही पर्यावरणाचे नियम उद्योगांकडून धाब्यावर बसविण्यात येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रातून तसेच नाल्यावाटे प्रक्रिया न करताच रासायनिक प्रदूषित पाणी सरळ नवापूरच्या खाडीत सोडण्यात येत असल्याने त्याचा गंभीर परिणाम किनारपट्टीवरील मच्छिमार व नागरिकांवर होत असल्याने अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती
राष्ट्रीय हरित लवादाकडील ९ जुलैच्या सुनावणी दरम्यान लवादाने तारापूरचे २५ एमएलडी क्षमतेचे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे का? तसेच उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रि येदरम्यान निर्माण होणाऱ्या घातक घनकचºयाची (स्लज) अधिकृतरित्या विल्हेवाट लावण्यात येते का? दिलेल्या परवानगी पेक्षा उद्योगातून (कन्सेट) अधिक प्रमाणात सांडपाण्याचा विसर्ग होतो का ? इत्यादीसह प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने उद्योगांची संपूर्ण तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या नंतर मागील आठवड्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ८ अधिकाºयांच्या पथकाने तारापूरला येऊन सुमारे ६० उद्योगाची तपासणी केली असे समजते
त्या पैकी कॅलीक्स केमिकल्स अँड फार्मास्युटीकल्स प्रा. ली. नायकेम आॅर्गेनिक्स, सिरॉन ड्रग्ज अँड फार्मास्युटीकल्स पॅरामाऊंट, उज्वल फार्मा, सुनील ग्रेट (एच. वाय. के. ) प्रोसेसर प्रा. ली. केमिकल डिव्हीजन एस .डी. फाईन केम ली.,डी आर व्ही आॅर्गेनिक्स , अ‍ॅरो लॅबरोटरीज ली, श्री चक्र आॅर्गेनिक्स प्रा. ली., लोविनो कपूर कॉटन प्रा. ली , रॅडीअँट इंटरिमडीएट प्रा. ली., पेंटागॉन ड्रग्ज प्रा. ली ,न्यूट्राप्लस इंडिया ली., पंचामृत केमिकल्स प्रा .ली.,एलेक्सो केमिकल्स.
हे १६ उद्योग पर्यावरणाचे नियम वेग वेगवेगळ्या पद्धतीने पायदळी तुडवून तर काही कन्सेंटच्या चौकटीत उत्पादन प्रक्रिया करीत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे यांच्यावर उत्पादन बंदच्या कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे . यापूर्वी अशा स्वरुपाची कारवाई अनेकदा केली गेली तरी तिला उद्योग भीक घालत नाहीत असेच स्पष्ट झाले आहे. अनेकदा तर वीज आणि पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई देखील अशा उद्योगांवर झाली. परंतु काळांतराने थातूरमातूर दंड करून अथवा कारवाई करून असे उद्योग पुन्हा सुरू केले जातात असा अनुभव आहे त्यामुळे आता काय होणार? हा प्रश्नच आहे.

संपर्क झाला नाही

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (ठाणे) प्रादेशिक अधिकारी एम आर लाड यांच्या मोबाईल वर कॉल तसेच मेसेज द्वारे संपर्क साधून जो सर्व्ह करण्यात आला त्या संदर्भात माहिती देण्याची विनंती केली परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सर्व्हेचा तपशील मिळाला नाही. रात्रीही त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही.
 

Web Title: Tarapur's 16 companies shut down, notices issued by pollution control board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.