तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, 12 जखमी

By ऑनलाइन लोकमत on Fri, March 09, 2018 12:20am

तारापूर एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये गुरुवारी (8 मार्च) भीषण स्फोट झाला आहे.

पालघर - तारापूर एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये गुरुवारी (8 मार्च) भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामुळे तारापूरसह पालघर, सातपाटी ,चिंचणी आदी 10 किमी परिसर हादरला आहे.  तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ई प्लॉट मध्ये असलेल्या नोवा फेम स्पेसिलिटी कंपनीमध्ये  झालेल्या स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने आजूबाजूच्या कंपन्यासुद्धा या स्फोटाच्या विळख्यात सापडल्या आहेत. दरम्यान, या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून 15 जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.  शिवाय,  मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत आहे.  

गुरुवारी रात्री नोवा फेना स्पेसिलिटी कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये ही कंपनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेजारच्या आरती ,भारत रसायन आणि अजून एक कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, स्फोटाच्या आवाजाने सुमारे 10 ते 15 किमी परिसर हादरला. स्फोटामुळे जमिनीला हादरे बसल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने ग्रामस्थांनी घरातून बाहेर धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आहे. तसेच अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत आगीबरोबरच स्फोटांची मालिका सुरू होती. दरम्यान, पहाटेच्या वेळी आग काहीशी आटोक्यात आली. पण या आगीत नोवा फेना कंपनीसह अन्य दोन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. 

'' रात्री  11.30 वाजण्याच्या सुमारास आम्ही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दल, महसूल खाते आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदतकार्याला सुरुवात केली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरू आहे'', अशी माहिती पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नरनवरे यांनी दिली. 

 

जखमी व्यक्तींची नावं

1. संजय जावडे (वय 25 वर्ष)  2) कैलास कुमार (वय 20 वर्ष)  3) दिनेश कुमार (वय 21 वर्ष)  4) सुनिल कुमार (वय 21 वर्ष)  5) सचिन राठोड (वय 19 वर्ष)  6) कैलास सोनावणे (वय 25 वर्ष)  7) उदय यादव (वय 42 वर्ष)  8) वक्सेत सिंग (वय 60 वर्ष)  9) मुकेश रावत ( वय 24 वर्ष)  10) सुनिल यादव ( वय 21 वर्ष)  11) उरविंद विश्वकर्मा ( वय 20 वर्ष)  12) कुडूबाई (वय 55 वर्ष)

 

 

 

 

 

 

संबंधित

Ganpati Festival : पाच दिवसांच्या बाप्पांना जल्लोषात निरोप देण्यास सुरुवात 
मुंबईत पेट्रोलची नव्वदीकडे कूच...महाराष्ट्रात नव्वदीपार
गुटखा वाहतूक केल्यास परवाना होणार रद्द
गोखिवरे डम्पिंगची डोकेदुखी; ४१३ कोटींचा घनकचरा प्रकल्प रखडला
वसईमध्ये घोरपडी वाढतायेत, शहरात होतोय वरचेवर प्रवेश

वसई विरार कडून आणखी

नागपुरात महापौरांच्या खुर्चीवर बॅनर धरून विरोधकांची नारेबाजी 
नळासाठी अर्जांचा खच
राज ठाकरेंचा टोला, मोदी अन् शाह हे वर्गाबाहेरचे खोडकर विद्यार्थी 
‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची रेमण्ड कंपनीमध्ये निवड
वाघिणीला मारण्याऐवजी जेरबंद करा

आणखी वाचा