ताडीला पुरक शेतीचा दर्जा मिळण्यासाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:34 AM2019-05-19T00:34:06+5:302019-05-19T00:34:13+5:30

जाचक अटींचा खोडा । ताडी विक्रीतून ग्रामीण भागातील तरुणांना मिळतोय रोजगार

Take the government to get the edible quality of the tree | ताडीला पुरक शेतीचा दर्जा मिळण्यासाठी शासनाला साकडे

ताडीला पुरक शेतीचा दर्जा मिळण्यासाठी शासनाला साकडे

Next

- राहुल वाडेकर


विक्रमगड : तालुक्यातील विविध गावपाडयात शासनाने ताडी विक्रीचे परवाने दिलेले आहेत़ ही ताडी साधारपणे सप्टेंबर ते जुलै या हंगामध्ये दरवर्षी काढली जाते़ ताड व खजुराच्या झाडांपासून निघणारा नैसर्गिक रस अर्थात ताडी. या विक्रीतुन येथील खेडया-पाडयातील तरुणांना रोजगार होत असतो़
ताडी काढण्यामध्ये देखील चढ उतार होत असल्याने थंडीच्या मोसमामध्ये ताडीचा उतरा चांगला येत असल्याने त्याकाळात एका ताडाच्या झाडास दिवसभरात जवळ जवळ सात ते आठ लिटर ताडी गळते ़तर मध्यतरीचा काळ म्हणजे उन्हयात ताडी गळयाचे प्रमाण कमी होते व ते निम्यावर येते सध्या एक लिटर करीता २५ रुपये असा भाव आहे़


दरम्यान, शासनाने या व्यवसायासाठी जाचक अटी व नियम लादल्याने या व्यवसायावर मर्यादा पडल्या आहेत़ त्यामुळे शासनाने या व्यवसायाला शेतीपूरक व्यवसाय म्हणुन मान्यता मिळावी, तसेच आकारल्या जाणाऱ्या करामध्ये सवलत मिळावी अशा अनेक मागण्या काही वर्षापासून प्रलंबित आहेत़
शासनाने काही तालुक्यांत ताडी व्यवसाय करणे करीता काही प्रमाणांत राखीव परवाने ठेवले आहेत़ त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील बेकार तरुणांना जर का नविन टी़ डी़ आर प्रमाणे ताडी विक्री परवाना देण्याचे धोरण उत्पादन शुल्क खात्याने व महाराष्टÑ शासनाने ठरविले तर काही बेकार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे याभागातील बेकारी दुर होण्यास मतदच होणार आहे़ ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर ताडी विक्री होत असते़ ताडी दारु व इतर विदेशी मद्य, गावठी दारु यांपेक्षा पिण्यास पाण्याप्रमाणे व चवीस गोडी असलेली ताडी शरीरास थंडावा देते, तर यामध्ये प्रमाणात ताडी सेवन केल्यास नैसर्गिक गुणधर्म असल्याने शरीरास उपाय कारक ठरत असते़


ताडीमुळे पोटांचे विकार दुर होतात तर मुतखडा पडण्यास मदत होते. जरी या पेयामुळे नशा येत असली तरी ताडीमध्ये अनेक गुणधर्म आहे़ मात्र, तिचे पिण्याचे प्रमाण मर्यादीत असले पाहीजे़ या व्यवसायातुन शासनाला मोठया प्रमाणावर महसुल मिळत आहे़ या व्यवसायाचा नविन परवाना ग्रामीण भागात देण्याकरीता ज्या जाचक अटी व शेती उत्पादन शेुल्क खात्याकडून लावल्या जात आहे त्यामुळे परवाना मिळणेस मोठी अडचण निर्माण झाली आहे़
या ग्रामीणभागात परवाना देतांना ताडी व खजरीच्या झाडांची अट टाकली आहे ती रद्द करावी व ज्याप्रमाणे बिअर-वाईन्स चे परवाने देतांना ती सर्व साधारण वर्गातील इच्छुकांना दिली जातात़ त्याप्रमाणे ताडी विक्री परवाना देखील देण्यात यावा अशी मागणी होत आहे़ ताडी व्यवसायामध्ये महत्वाचे काम टॅपर अर्थात छेदक यांचे असुन पावसाळयात निसरडया झाडावरुन झाडावर चढणे कठिण होत असल्याने या काळात ब-याच ठिकाणी ताडी उत्पादन बंद ठेवण्यात येते़ शासनानच्या परवाना शेुल्क त्याचप्रमाणे वेगवेगळया खर्चामुळे ताडी सध्या २५ रुपये एक लिटर इतक्या दाराने विकली जाते़ ताडीपासून गूळ, ताडीची पावडर इत्यादी पदार्थ बनविण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येत असला तरी देखील याबाबत विशेष संशोधन व अभ्यास करण्यात आला नसल्याचे दिसुन येत आहे़

झाडावरुन ताडी काढण्याची पध्दत
ताडी काढण्याकरीता भंडारी अर्थात हा व्यवसाय करणारे तरुण यांना भंडारी म्हंटले जाते ते पहाटे पाच वाजता रोज झाडांवर चढून शेंगा अगर ताळगोळयांचा घडाचे टोक पातळ कापून त्यातून ताडी गळण्याकरीता शेव केली जाते व त्यास मडके बांधून दिवसभर ठवेले जाते़ संध्याकाळी ५ वाजता पुन्हा चढून मडक्यामध्ये साठलेली ताडी्मध्ये ओतून पुन्हा शेव केली जाते पुन्हा मडकेबांधून ठेवले जाते असा हा रोजचा कार्यक्रम चालतो. एका झाडास साधारण ७ ते ८ लिटर ताडी गळते अशी सात आठ झाडांची ताड एकत्र करुन २५ रुपये लिटर प्रमाणे त्याची विक्री होत असते़ व त्यातून रोजगार उपलब्ध होतो़
 

शासनाने ताडी विक्री व्यवसायाकारीता ठेवलेल्या जाचक अटी येथील कराव्यात व सर्व ताडी विक्रेत्यांना कायदेशिररित्या परवाने दयावे याकरीता असलेली शासनाची फी भरण्यास आम्ही तयार आहोत़ याकरीता शासनास महसुल मिळेल व आम्हांस रोजगार उपलब्ध होईल़ यावर अनेकांचे पोट भरले जाते़ वा शेती पुरक व्यवसाय म्हणून मान्यता मिळावी़
-रावजी तुंबडा,
भंडारी, आंबेघर गांव

Web Title: Take the government to get the edible quality of the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.