वसई : पेल्हार प्रभागातील ठेका पद्धतीवर काम करीत असलेल्या अभियंत्याला सहाय्यक आयुक्तांच्या नावावर वसुली करीत असल्याच्या आरोपावरून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
मिलिंद शिरसाट असे ठेका पद्धतीवर काम करणाºया अभियंत्याचे नाव आहे. वसई विरार महापालिकेच्या पेल्हार प्रभाग समितीत कार्यरत असलेले शिरसाट सहाय्यक आयुक्तांच्या नावाने अनधिकृत बांधकाम करणाºयांकडून वसुली करीत असल्याची तक्रार आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी शिरसाट यांचे निलंबन केले.
जानेवारी महिन्यात एका ठेका अभियंत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत मौजमजा करणाºया १२ ठेका अभियंत्यांना आयुक्तांनी निलंबित केले होते. मात्र, राजकीय दबावापोटी आयुक्त सतीश लोखंडे यांनी ठेका अभियंत्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी निलंबित केल्यानंतर त्यांची चौकशी करण्याची कायद्यात कोणतीच तरतूद नसताना दोनदा चौकशी समिती नेमली होती. ठरल्याप्रमाणे चौकशी समितीने सर्व अभियंत्यांना क्लीन चिट देण्याचे सोपस्कार पार पाडले होते. त्यानंतर सर्वांना पुन्हा कामावर रुजुही करून घेण्यात आले होते. त्यामुळे शिरसाट यांचे निलंबन किती काळ राहते याकडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याकडे जाणिवपूर्वक दिरंगाई, टाळाटाळ, हलगर्जीपणा, उदासिनता दाखवल्याचा ठफका
ठेवत आयुक्तांनी गणेश पाटील (पेल्हार प्रभाग समिती), मोहन संख्ये (बोळींज), प्रकाश जाधव (नालासोपारा पश्चिम), प्रदीप आवडेकर (वसई) या चार सहाय्यक आयुक्तांना गेल्या सोमवारी निलंबित करण्यात आले आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.