सूर्याचे ५ दरवाजे उघडले, उधाणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:06 AM2018-07-16T03:06:24+5:302018-07-16T03:06:29+5:30

डहाणू तालुक्यात जोरदार पाऊस झाला असल्याने कासा भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

The sun's 5 doors opened, the collision hit | सूर्याचे ५ दरवाजे उघडले, उधाणाचा फटका

सूर्याचे ५ दरवाजे उघडले, उधाणाचा फटका

Next

- शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू तालुक्यात जोरदार पाऊस झाला असल्याने कासा भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. धामणी धरणाचे सर्व पाचही दरवाजे उघडले असून सूर्या नदीत १७४३४ क्यूसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे मोठा पूर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील सतत पाऊस पडत होता. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. धामणी धरण ७८ टक्के भरले असून धरणक्षेत्रात दिवस भरात १४४ मी मी पाऊस झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी ११४ मीटर आहे. धरणाचे सर्व पाचही दरवाजे दोन फुटणे उघडले आहेत. त्या खालील दुसरे कवडास धरण भरून वाहते आहे.
दोन दिवसांपासून सूर्या नदीला पूर आल्याने पेठ म्हसाड जवळील पूल दोन दिवस पाण्याखाली आहे.त्या परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच कासा भागातील गुलजारी व चिखली नदीलाही पूर आल्याने त्या खालील लहान पूल व मोº्या पाण्याखाली गेल्या होत्या.सतत पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची भात रोपणीची कामे थांबली आहेत.
पूरसदृश्य स्थिती कायम असल्याने अजूनही पूर, मोºया पाण्याखाली असल्याने तर कुठे चिखल, दलदल असल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे. किनाºयावरील गावे, पाडे यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनही कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास सज्ज ठेवण्यात आले आहे. पाऊस सतत सुरू असल्याने कोणत्याही क्षणी धरणातून होणारा विसर्ग वाढू शकतो. तसेच पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि ओघ वाढू शकत असल्यामुळे त्यावर पूर नियंत्रक कक्ष लक्ष ठेवून आहे.


वसईत पावसाची जोरदार हजेरी, हजारो हेक्टर पिके पाण्याखाली
पारोळ : वसईकरांच्या मनावरील पुराचे भय कायम असतांनाच शनिवार व रविवारी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने वसई पांढर तारा, मेढे हे पूल पाण्याखाली गेले. शेकडो हेक्टर मधील भाताच्या पेरण्या पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. तर शहरी भागात पावसाचा जोर कमी असल्याने पूरस्थिती निर्माण झाली नाही.या वर्षी वसईला पावसाने मोठा तडाखा दिला, यामुळे वसई, विरार, नालासोपारा, तीन दिवस जलमय झाली. वीज नसल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले, अनेक कुटुंबांवर अन्न पाण्याशिवाय राहण्याची वेळ आली. रस्ते पाण्याखाली, वाहतूक बंद, जलमय झाल्याने बाजार बंद, रेल्वे ठप्प, अशी स्थिति पावसाने निर्माण केल्याने व्यापारी, उद्योजक व शेतकºयांचे नुकसान झाले. हजारो घरात ४-५ फूट पांणी शिरल्याने रहिवाशांच्या अन्नधान्य व इतर वस्तूचे मोठे नुकसान झाले. या पुराच्या वसईकरांच्या मनात जखमा ताज्या असतानाच रविवारी सकाळ पासूनच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने आता हा पाऊस देखील पुन्हा तीन दिवस घरात बसवतो की काय? अशी भीती वसईकरांना भेडसावू लागली आहे. तिच्यावर सध्या तरी कोणताही उतारा नाही.
>तडीयाळे गुंगवाडा धाकटी डहाणूमध्ये भरतीचे पाणी घुसले
डहाणू : मुसळधार पाऊस आणि समुद्राची भरती यामुळे समुद्रकिनारच्या डहाणू किनारपट्टीवरील वाढवण, तडियाळे, गुंगवाडा, या गावांमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले. धाकटी डहाणू चिंचपाडामध्ये तर समुद्राच्या भरतीच्या माºयामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर भरतीचे पाणी थेट गावात शिरल्याने रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली. घरात पाणी शिरण्याच्या भितीने ग्रामस्थांनी आपल्या घरातील साहित्य उंचावर सुरक्षित ठिकाणी ठेवले. त्यातच कोसळणाºया मुसळधार पावसामुळे भीतीचे वातावरण पसरले. तिडयाळे येथील किनारपट्टी ५ मीटर उंचीच्या समुद्राच्या लाटांनी वाहून नेली. त्यामुळे किनारा असुरक्षित झाला आहे.
>तिडयाळे तसेच धाकटी डहाणू येथे मच्छीमारांच्या घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करु न त्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याची आवश्यकता आहे
-वशीदास अंभिरे मच्छीमार नेते

Web Title: The sun's 5 doors opened, the collision hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.