आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा?, कासा रु ग्णालयात ७ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:49 AM2017-11-10T00:49:05+5:302017-11-10T00:49:08+5:30

या तालुक्यातील दाभाडी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

The students of the ashram school are poisoned ?, 7 cases in the hospital | आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा?, कासा रु ग्णालयात ७ दाखल

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा?, कासा रु ग्णालयात ७ दाखल

Next

शौकत शेख
डहाणू : या तालुक्यातील दाभाडी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
गुरुवारी आदिवासी विकास विभागाच्या शिक्षण सचिव मनिषा वर्मा, डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आँचल गोयल यासह शासकीय अधिकाºयांनी गुरु वारी पहाटे दाभाडी शासकीय आश्रमशाळा, सायवन प्रा. आ. केंद्र यांची प्रत्यक्ष पाहणी करुन आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्यात मनीषा तुलजी दुमाडा (१४), कंचन काशीनाथ बाबर (१४), शीतल सखाराम बोरसा (११), सोनाली परशुराम चौधरी (१०), रुचिता किसन भोये (१६), जोनिका सुरेश नडगे (१०), संचिता विनोद चौधरी (९) यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.
आदिवासी विकास विभागाच्या संचलित दाभाडी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास उल्टी, जुलाब, मळमळणे असा त्रास सुरु झाल्याने दुपारपर्यंत ७६ विद्यार्थ्यांना सायवन प्राथमिक रु ग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी ५९ विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले असून या १० विद्यार्थ्यांना दाखल करून उपचार केले गेले. त्यापैकी ७ जणांवर कासा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी आदिवासी आश्रमशाळांतर्गत सामन्यांमध्ये काही विद्यार्थ्यांनी बाहेरचे पदार्थ खाल्याने हा प्रकार घडला असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडल्याने आश्रमशाळेत दिलेले रात्रीचे भोजन व त्यासोबतचे दूषित पाण्यामुळे ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक संशय असून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकारानंतर आश्रमशाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी कासा बुद्रुक येथे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती.

Web Title: The students of the ashram school are poisoned ?, 7 cases in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.